Ashadhi Wari : रिंगणानंतर वैष्णवांचा मेळा वाखरीत

अठरा दिवसांची वाटचाल पूर्ण करत संत तुकोबारायांचा पालखी सोहळा पंढरी समीप सोमवारी रात्री वाखरी मुक्कामी पोचला आहे. माऊलींच्या पालखी सोहळ्यातील रिंगणातील विश्वरुप दर्शनाच्या साक्षीने संत तुकोबारायांच्या वाखरी उड्डाणपुलाच्या पुढे दोन्ही अश्वांनी बेफाम वेगात रिंगण पूर्ण करून उपस्थित लाखो भाविकांचे लक्ष वेधले.
Ashadhi Wari
Ashadhi Warisakal
Updated on

वाखरी : अठरा दिवसांची वाटचाल पूर्ण करत संत तुकोबारायांचा पालखी सोहळा पंढरी समीप सोमवारी रात्री वाखरी मुक्कामी पोचला आहे. माऊलींच्या पालखी सोहळ्यातील रिंगणातील विश्वरुप दर्शनाच्या साक्षीने संत तुकोबारायांच्या वाखरी उड्डाणपुलाच्या पुढे दोन्ही अश्वांनी बेफाम वेगात रिंगण पूर्ण करून उपस्थित लाखो भाविकांचे लक्ष वेधले.

पिराची कुरोली येथील तळावर संत तुकोबारायांच्या पादुकांचे पूजा भंडारा डोंगर ट्र्स्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांच्या हस्ते महापूजा झाली. देहूकर मालकांच्या वतीने कीर्तन सेवा झाली. त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास संत तुकोबारायांचा पालखी सोहळा वाखरीच्या दिशेने मार्गस्थ झाला. मजल दरमजल करीत सोहळा वाखरी जवळ आला.

पुढे माऊलींचा सोहळा असल्याने संत तुकोबारायांच्या पालखीचा वेग मंदावला होता. माउलींची पालखी सोहळा गोल रिंगणासाठी आत गेला. दरम्यान, संत तुकाराम महाराजांचा सोहळ्याचे विसावा घेतला. संत तुकोबारायांच्या पालखीचा चौघडा पाच वाजता उड्डाणपुलावरून खाली उतरला.

त्यानंतर देहुकर मालकांच्या सूचनेनुसार नामदेव चोपदार यांनी कानसुरकर, देशमुख चोपदारांच्या माध्यमातून रिंगण लावण्यात आले. यानंतर एका मागे एक असे दोन्ही अश्वांनी नगरखान्यापर्यंत बेफाम दौड लावली. साडेपाच वाजता रिंगण पूर्ण झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.