Pune Police: महिलांवरील हल्ल्याच्या घटनांनंतर पोलीस अ‍ॅक्शनमोडमध्ये; घेतला मोठा निर्णय; आता...

महिलावर शहरात हल्ले होऊ लागल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे
Pune Police
Pune PoliceEsakal
Updated on

शाळा व कॉलेजसाठी जाणाऱ्या तरुणींवर कार्यालयातून रात्री उशिरा घरी जाणाऱ्या महिला यांच्यावर पुणे शहरात हल्ले होऊ लागल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर पोलीसांनी ठोस पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. (Latest Marathi News)

सदाशिव पेठेत झालेला हल्ला, दर्शना पवार खून प्रकरण, रिक्षेत महिलेचा झालेला विनयभंग अशा घटना घडल्याने दामिनी पथक आणि बीट मार्शलची संख्या वाढविण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील शाळा, महाविद्यालये, क्लासेस, अभ्यासिका तसेच गर्दीच्या ठिकाणी दामिनी पथक आणि बीट मार्शल गस्त घालणार आहे. बीट मार्शलला सकाळ आणि संध्याकाळी अशा दोन सत्रात जबाबदारी देण्यात येणार आहे. नाकाबंदी करून संशयित व्यक्तींची तपासणी देखील करण्यात येणार आहे.(Latest Marathi News)

शहरातील शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नोकरदार महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘पोलिस काका’, ‘पोलिस दीदी’ आणि ‘बडीकॉप’ योजना कार्यक्षमपणे राबविण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश सर्व पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी पुणे पोलिसांकडून सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दिली आहे.(Latest Marathi News)

शहरातील संबंधित पोलिस ठाण्यांतील अधिकाऱ्यांकडून शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. पोलिस चौक्या २४ बाय ७ दिवस सुरू राहणार असून, ‘सीसीटीव्ही’ने जोडल्या जातील. दामिनी पथकाची संख्या १५ वरून ४० पर्यंत वाढविण्यात येणार आहे. तसेच, बीट मार्शलची संख्याही शंभरवरून दोनशे करण्यात येणार आहे. शाळा-महाविद्यालय सुरू होताना आणि सुटताना परिसरात बीट मार्शल आणि दामिनी पथकांनी गस्त घालावी, असे आदेश दिल्याची माहिती रितेश कुमार यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.(Latest Marathi News)

Pune Police
Pune Crime : 'तिची जात कुठली'? लेशपालच्या इंस्टा स्टोरीनं वेगळ्याच चर्चेला उधाण, सदाशिव पेठेतील 'ती' घटना!

कर्तव्ये

विद्यार्थ्यांना संकट काळात मदतीसाठी धावून जाणार

मुलींची छेडछाड, दादागिरी, रॅगिंगचा त्रास होत असल्यास मदत

कोणी लग्नाचे, नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक होत असल्यास त्यावर लक्ष ठेवणे

लैंगिक शोषण, गुड टच-बॅड टच रोखण्याबाबत प्रबोधन

शाळा-महाविद्यालयात तक्रार पेटी बसवून दर सोमवारी तक्रारींबाबत कार्यवाही

Pune Police
Pune Girl attack : Gopichand Padalkar यांनी केला निषेध, Devendra Fadnvais यांना केली 'ही' विनंती

गुन्हेगारी घटनांबाबत आयुक्तांना निवेदन

सदाशिव पेठेत भरदिवसा तरुणीवर हल्ला, वाहन तोडफोडीच्या घटना अशा वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने बुधवारी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची भेट घेतली. गुन्हेगारी रोखण्यासाठी कृती आराखडा करण्याची मागणी त्यांनी केली. भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, हेमंत रासने, धीरज घाटे, अजय खेडेकर, दीपक नागपुरे, अमोल कविटकर, पुनीत जोशी, दीपक पोटे, संदीप लोकर, बापू मानकर आदी या वेळी उपस्थित होते.(Latest Marathi News)

Pune Police
Pune Crime : पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना! एकाच कुटुंबातील चार जणांचे आढळले मृतदेह

बडीकॉप योजना

परिमंडळ पोलिस उपायुक्त, सहायक आयुक्त आणि महिला पोलिसांचा सहभाग

नोकरदार महिलांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार करणार, अडचण आल्यास व्हॉट्सअप किंवा फोनद्वारे संपर्क

तक्रारी आणि मदत मागितल्यास त्वरित प्रतिसाद

नोकरदार महिलांसाठी कामांच्या ठिकाणी सुरक्षिततेचा दर्जा उंचावणे

प्रत्येक पोलिस ठाण्यात ५ ते १५ कर्मचाऱ्यांची बडीकॉप म्हणून निवड

Pune Police
Pune Crime: दर्शना पवार मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण! पोस्ट मार्टममधून खळबळजनक माहिती समोर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()