Uddhav Thackrey : निवडणूक आयोगाचा निकाल ठाकरेंच्या जिव्हारी; घेतले एक पाऊल मागे

ठाकरे गटाकडून मोठा बदल, राजकीय वर्तुळात एकच चर्चा
Uddhav Thackrey
Uddhav ThackreyEsakal
Updated on

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून काल (शुक्रवारी) शिवसेना पक्षचिन्हाबाबत मोठा निर्णय दिला आहे. आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटालाच दिलं. या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून शिंदे गटात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. उद्धव ठाकरे यांनी या निर्णयावर टीका केली असून आपण सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. तर आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी विरोधकांसह आयोगावरही जोरदार टीका केली आहे. निवडणूक आयुक्तांनी शेण खाल्लं या शब्दात ठाकरेंनी हल्लाबोल केला.

एकीकडे शिवसेना नव आणि पक्षचिन्हं मिळाल्यामुळे शिंदे गटाकडून जल्लोष व्यक्त करण्यात येत आहे. तर ठाकरे गटावर पक्षाचे नाव आणि चिन्ह गेल्यानंतर आणखी एक महत्वाचं पाऊल उचललं आहे. ठाकरे गटाने शिवसेनेच्या ट्विटर हँडलवरून शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दोन्ही हटवले आहे. ट्विटर हँडल आणि वेबसाईट हे दोन्ही शिवसेनेच्या नावावर सुरू होते. तर ठाकरे गटाकडुन हे सोशल मिडीया हाताळत होते. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाने हे पाऊल उचललं आहे.

Uddhav Thackrey
Pankaja Munde : अडचणीत सापडलेल्या उद्धव ठाकरेंना पंकजा मुंडेंचा फोन

तर शुक्रवारी निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयानंतर रविवारी अचानक शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलचं (@ShivSena) ब्ल्यू टिक गेल्याचं पाहायला मिळालं. तसेच शिवसेनेची ShivSena.in ही अधिकृत वेबसाईटही बंद पडल्याचं समोर आलं होतं. सुरुवातीला दोन्ही अकाऊंट हॅक झाल्याची चर्चा सुरू होती. मात्र आता ठाकरे गटानेच हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.

Uddhav Thackrey
Shivsena : ठाकरे गट अॅक्शन मोडमध्ये! 'या' प्रकरणात ठोठावणार सुप्रीम कोर्टाचे दार

तर दुसरीकडे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्हं शिंदे गटाला मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह जवळ जवळ सर्वच मंत्र्यांनी आणि शिंदे गटाच्या मोठ्या नेत्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरती धनुष्यबाण चिन्हं लावण्यात आलं. त्यामुळे हा एक चर्चेचा विषय ठरला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()