3 महिन्यांनी गणवेश मिळाला, पण कोणाला सैल तर कोणाला होतोय फिट! मुख्याध्यापकांच्या तक्रारी; शिक्षणाधिकारी म्हणाले, शाळेत विद्यार्थ्यांच्या मापानुसार करा अदलाबदल

यंदा सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळायला शाळा सुरू झाल्यानंतर तीन महिने लागले. मात्र, योग्य मापाअभावी विद्यार्थ्यांची अडचण झाली आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांनी प्राथमिक शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. त्यावर मिळालेल्या गणवेशांची अदलाबदल करण्याच्या सूचना देण्याची वेळ शिक्षण विभागावर आली आहे.
sakal solapur
zp schoolmaharashtra
Updated on

सोलापूर : यंदा जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळायला शाळा सुरू झाल्यानंतर तीन महिने लागले. मात्र, योग्य मापाअभावी विद्यार्थ्यांची अडचण झाली आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांनी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. त्यावर मिळालेल्या गणवेशांची अदलाबदल करण्याच्या सूचना देण्याची वेळ शिक्षण विभागावर आली आहे. यावरुन सरकारी निर्णयातील गोंधळाने प्रशासनासमोरही अडचणी उभ्या केल्याचे दिसून येत आहे.

यंदा विद्यार्थ्यांना तयार दोन गणवेश देण्याचा निर्णय झाला. त्यासाठी कापलेले कापड देण्यासाठी ठेका देण्यात आला. तर गणवेश शिलाईची जबाबदारी महिला आर्थिक महामंडळाकडे सोपविण्यात आली. परंतु, ठेकेदाराकडून महामंडळाला वेळेत कापलेले कापड मिळाले नाही. त्यामुळे वेळेत गणवेशांची शिलाई होऊ न शकल्याने स्वांत्र्यदिनीही विद्यार्थ्यांना जुन्या गणवेशात यावे लागले. शिलाईसाठी लागणाऱ्या साहित्यांचा अपुरा पुरवठा, खराब कापड या अडचणींची भर पडल्याने शिलाईतही अडचणी उभ्या राहिल्या. तरीही महामंडळाने गणवेशाची शिलाई करून टप्प्याटप्प्याने गणवेशाचा पुरवठा केला. येत्या तीन दिवसांत शाळा सुरू होऊन तीन महिने होत आहेत. तरीही दोन लाख आठ हजार ९३१ विद्यार्थ्यांपैकी ५१ हजार ४९१ विद्यार्थी अजून गणवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. गुरुवार (ता. १२) पर्यंत एक लाख ५७ हजार ४४० विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले आहेत.

विद्यार्थी अजूनही जुन्या गणवेशात शाळेत

टप्पटप्प्याने गणवेश विद्यार्थ्यांपर्यंत पोचायला शाळा सुरू झाल्यावर तीन महिन्यांचा कालावधी गेला. त्यानंतर गणवेश मिळूनही योग्य मापाअभावी विद्यार्थ्यांना त्याचा फायदा नसल्याची स्थिती आहे. अयोग्य मापाचा गणवेश घालता येत नसल्याने विद्यार्थ्यांना अजूनही जुन्या गणवेशात शाळेत यावे लागत आहे. विशेषतः विद्यार्थिनींची मोठी अडचण होत आहे. ठेकेदाराने प्रमाणित मापानुसार कापड कापून शिलाईसाठी महामंडळाला पुरवठा केला. पूर्वी शाळा व्यवस्थापन समितीमार्फत पुरवल्या जाणाऱ्या गणवेशासाठी शिक्षक विद्यार्थ्याच्या माप घेऊन शिलाई करायचे. परंतु यावेळेस माप न घेता गणवेश पुरवल्याने ते मिळाल्यावरही परिधान करता येईना, अशी विद्यार्थ्यांची स्थिती झाली आहे.

मुख्याध्यापकांच्या तोंडी तक्रारी, पण त्यांना उपाय सांगितला

प्रमाणित मापानुसार शिलाई करून गणवेशांचा पुरवठा केला आहे. त्यामुळे गणवेशाच्या मापाविषयी मुख्याध्यापकांच्या तक्रारी आहेत. त्यांनी बैठकीत त्या मांडल्या आहेत. मात्र, लेखी तक्रारी न आल्याने त्यांची संख्या सांगता येत नाही. विद्यार्थ्यांच्या मापानुसार मिळालेल्या गणवेशाची अदलाबदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

जिल्ह्यातील शालेय गणवेशाची सद्य:स्थिती

  • एकूण विद्यार्थी

  • दोन लाख आठ हजार ९३१

  • गणवेश शिलाई पूर्ण

  • एक लाख ९५ हजार २७८

  • विद्यार्थ्यांना मिळालेले गणवेश

  • एक लाख ५७ हजार ४४०

  • शाळांना पाठविण्यासाठी तयार

  • ३७ हजार ८३८

  • अजून वाटप राहिलेले गणवेश

  • १३ हजार ६५३

  • गणवेश न मिळालेले विद्यार्थी

  • ५१ हजार ४९१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.