उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर केसीआर यांनी घेतील शरद पवारांची भेट

या दोन्ही नेत्यांमधील चर्चेचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.
KCR_SharadPawar
KCR_SharadPawar
Updated on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतल्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K Chandrashekar Rao) यांनी राज्यातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या देखील उपस्थित होत्या. दरम्यान, या दोन नेत्यांमध्ये काय चर्चा झाली याचा तपशील अद्याप कळू शकलेला नाही. (After Uddhav Thackeray visit Telangana CM KC Rao meets Sharad Pawar)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर केसीआर म्हणाले, देशातील राजकारण आणि स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरच्या स्थितीबद्दल चर्चा करण्यासाठी मी महाराष्ट्रात आलोय. उद्धव ठाकरेंशी बोलून प्रसन्न वाटलं. अनेक मुद्यांवर चर्चा झाली आणि सहमतीही झाली. देशात सुधारणा आणण्यासाठी, देशाचा विकास करण्यासाठी चर्चा झाली. बऱ्यापैकी सर्व विषयांवर ही चर्चा झाली. येत्या काही दिवसांत आम्ही हैद्राबादमध्येही भेटू. महाराष्ट्र सरकारच्या सहकाऱ्यानं अनेक गोष्टी आमच्यासाठी सुकर झालेल्या आहेत. त्यामुळे ही दोस्ती निभवायची आहे.

KCR_SharadPawar
महाराष्ट्रातून निघालेला मोर्चा यशस्वी होतोच; केसीआर यांचा इशारा

आज एक सुरुवात झालीये आणि आम्ही थेट स्पष्टपणे सांगितलंय. आम्ही इतर नेत्यांशीही खुलेपणाने बोलू. कशाप्रकारे तिसऱ्या आघाडीची सुरुवात होईल, याबाबत आम्ही चर्चा करु. अत्यंत वाईट पद्धतीने केंद्रीय यंत्रणांचा वापर करत आहेत, यात काही शंकाच नाही. मात्र, केंद्र सरकारला ही नीती बदलावी लागेल, अन्यथा त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील, असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय, असंही यावेळी केसीआर यांनी म्हटलं.

KCR_SharadPawar
गोष्टी खोट्या पद्धतीनं सांगण्याचा उद्योग बंद व्हायला हवा - मुख्यमंत्री

दरम्यान, उद्धव ठाकरे म्हणाले, "संपूर्ण देशात राज्य एकमेकांचा शेजारधर्म विसरलेत. तेलंगणा-महाराष्ट्राची सीमा हजार किमीची असल्यानं आम्ही सख्खे शेजारी आहोत. नाहीतर प्रत्येकजण एक काहीतरी इरादा घेऊन पुढे चाललाय. राज्य गेलं खड्यात, देश गेला खड्ड्यात, अशी सध्या स्थिती आहे. आता देशात नव्या विचारांची सुरुवात झाली आहे. हा विचार पुढे न्यायाला थोडा वेळ लागेल आणि प्रयत्नांची एकदा सुरुवात केल्यानंतर मेहनत तर करावी लागणार. शेवटी देशाचे मुलभूत प्रश्नांना हात घालण्याऐवजी दुसऱ्याला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. तुम्ही नाही केलं हे देखील खोट्या पद्धतीनं सांगायचा कारभार मोडायला पाहिजे"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()