Eknath Shinde: "बेडूक किती फुगला तरी.." CM शिंदेंवर भाजपमधून आक्रमक टिका! वाद चिघळणार?

भाजपच्या खासदाराची पहिल्यांदाच एकनाथ शिंदे यांच्यावर उघड उघड टीका केली आहे
Eknath Shinde
Eknath ShindeEsakal
Updated on

'राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे अशी जाहिरात काल सर्व वर्तमानपत्रांमध्ये झळकली होती. या जाहिरातीतील मजकूर भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला असल्याचे दिसून येत आहे. या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे फोटो झळकले होते मात्र देवेंद्र फडणवीस यांना वगळण्यात आलं होतं. तसेच एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत. बाकी कोणी नाही, असंही या जाहिरातीतून अप्रत्यक्षपणे सुचवण्यात आल्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणात रंगू लागल्या आहेत. (Latest Marathi News)

या संपूर्ण प्रकरणात भाजपच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. तर भाजप खासदार अनिल बोंडे यांनी थेट आणि उघडपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटात मोठी ठिणगी पडण्याची शक्यता दिसून येत आहे.

भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी बोलताना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच हल्लाबोल केला आहे. 'बेडूक किती फुगला तरी हत्ती बनत नाही', अशा शब्दात अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सर्व्हेच्या जाहिरातीवर प्रतिक्रिया दिली आहे.

Eknath Shinde
Maharashtra Politics: 'भालकेंनी पवारांचा विश्वासघात केला; त्यांना मोठी राजकीय किंमत मोजावी लागेल'

बोंडे यांनी एक प्रकारे शिंदे यांची बेडकाशीच तुलना केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शिंदे चांगले मुख्यमंत्री आहेत. राज्याच्या जनतेने त्यांना स्वीकारले आहे. मात्र त्यांना त्याच्या आजूबाजूचे चुकीचे सल्ले देत आहे, असं सांगतानाच शिंदे यांना ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र वाटायला लागलाय, मात्र देवेंद्र फडणवीस आज असा चेहरा आहे जो बहुजनासाठी काम करतो. सर्व गोष्टीला न्याय देण्याचं काम त्यांनी केलं आहे, असं अनिल बोंडे यांनी म्हंटलं आहे.

Eknath Shinde
Nashik Cyber Police : दंगली रोखण्यासाठी नाशिक पोलिसांची सोशल मीडियावर 'सायबर गस्त'; वापरणार विशेष सॉफ्टवेअर

काय म्हणाले आहेत अनिल बोंडे?

'बेडूक किती फुगला तरी हत्ती बनत नाही'. शिंदे चांगले मुख्यमंत्री आहेत. मात्र त्यांना त्याच्या आजूबाजूचे चुकीचे सल्ले देत आहे, शिंदे यांना ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र वाटायला लागलाय असं अनिल बोंडे म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.