व्हायचे होते कृषी शास्त्रज्ञ अन्‌ झाले ‘आयपीएस’! CIDचे उपमहानिरीक्षक हिरेमठ यांची कहाणी

नागपूर येथून ‘कृषी’ची पदवी घेतली. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी दिल्लीला गेलो आणि त्याठिकाणी कृषी क्षेत्रात शास्त्रज्ञ होण्याचे स्वप्न पाहिले. पण, तिथपर्यंत पोहचणे कठीण होते. त्यामुळे दिल्लीत राहून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. मेहनत, जिद्द, चिकाटीच्या बळावर चौथ्या प्रयत्नात २००६-०७ मध्ये यश मिळाले आणि ‘आयपीएस’ झालो, असा प्रवास तत्कालीन पोलिस आयुक्त तथा पुणे सीआयडीचे पोलिस उपमहानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांनी ‘कॉफी विथ सकाळ’मध्ये उलगडला.
SUDHIR HIREMATH
SUDHIR HIREMATHSAKAL
Updated on

सोलापूर : सोलापुरातील श्राविका, पंढरपुरातील इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत आणि पुढे आयएमएस व दयानंद कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर नागपूर येथून ‘कृषी’ची पदवी घेतली. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी दिल्लीला गेलो आणि त्याठिकाणी कृषी क्षेत्रात शास्त्रज्ञ होण्याचे स्वप्न पाहिले. पण, तिथपर्यंत पोहचणे कठीण होते. त्यामुळे दिल्लीत राहून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. मेहनत, जिद्द, चिकाटीच्या बळावर चौथ्या प्रयत्नात २००६-०७ मध्ये यश मिळाले आणि ‘आयपीएस’ झालो, असा प्रवास सोलापूरचे तत्कालीन पोलिस आयुक्त तथा पुणे सीआयडीचे पोलिस उपमहानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांनी ‘कॉफी विथ सकाळ’मध्ये उलगडला. तत्पूर्वी, सहयोगी संपादक अभय दिवाणजी यांनी त्यांचे स्वागत केले.

SUDHIR HIREMATH
ठाकरे सरकार घेणार मोठा निर्णय! १० गुंठ्यांपर्यंत जमीन खरेदी-विक्रीला परवानगी

स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर हिरेमठ यांनी नाशिक, भंडारा, अकोला, गडचिरोली, वाशिम, पुणे अशा जिल्ह्यांमध्ये काम केले. गडचिरोलीतील अहेरी या नक्षली भागात त्यांनी उत्कृष्ट व मोलाची कामगिरी बजावली. त्याठिकाणच्या लोकांच्या बेसिक गरजा पूर्ण करण्याकडे भर दिला. पोलिस अधिकारी, कर्मचारी, सी-६० च्या जवानांसोबत राहून त्यांना बळ दिले. वाशिमच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती मिळाल्यानंतर त्यांनी तेथे जातीय सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. स्मार्ट पोलिसिंग आणि लोकसंवादातून सामाजिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राहू शकते, हे त्यांनी कामातून दाखवून दिले. पुणे, पिंपरी चिंचवड येथे पोलिस उपायुक्त, वाहतूक म्हणून काम करताना बेशिस्त वाहनचालकांना स्वयंशिस्त लावून वाहतूक कोंडी व अपघात कमी करण्याचाही प्रयत्न केला. ‘पोलिस काका’ या उपक्रमातून लोकांची पोलिसांविषयीची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न हिरेमठ यांनी केला. उमंग, मी सायबरपासून दूर असेही उपक्रम राबवून लोकांमध्ये जागृती केली. पोलिस दलातील त्यांच्या कामाची दखल घेत राज्यभर असे उपक्रम राबविले गेले. सोलापूर पोलिस आयुक्त म्हणून त्यांनी नऊ दिवस प्रभारी आयुक्त म्हणून काम केले. शिस्त व कामाच्या बाबतीत स्ट्रिक म्हणून त्यांची ओळख असल्याने आठ-दहा दिवसांतच शंभरहून अधिक बेशिस्त हातगाडे, ५० पेक्षा जास्त रिक्षा व चारचाकी वाहनांवर आणि १०० पेक्षा अधिक दुचाकीस्वारांवर कारवाया केल्या.

SUDHIR HIREMATH
शाळा सुरु होण्यापूर्वी वर्गखोल्यांची सॅनिटायझर फवारणी अन्‌ स्वच्छता बंधनकारक

‘आई’च्या कष्टातून घडलो

वडील पाटबंधारे विभागात असल्याने त्यांची सातत्याने काही वर्षांनी बदली व्हायची. वारंवार शाळा बदलाव्या लागत होत्या. अशावेळी आईने तिन्ही मुलांना शिक्षणाच्या बाबतीत काहीच कमी पडू दिले नाही. खूप मेहनत, कष्ट करून आईने आम्हाला शिकवले आणि मी पोलिस अधिकारी होऊ शकलो. त्यामुळे माझा पहिला गुरु आईच आहे, असेही हिरेमठ यांनी यावेळी आवर्जुन सांगितले. पुढे डॉ. विजय झाडे, डॉ. समीर इगवे, राजेंद्रसिंह, जगन्नाथ, सुबोध जयस्वाल, अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाल्याचेही ते म्हणाले.

SUDHIR HIREMATH
१८ जूनला उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापुरात! तांड्यावरील ‘बंजारा ब्रॅण्ड’ जर्मनीला जाणार

गडचिरोलीत सी-६० आपली ताकद

छत्तीसगड, तेलंगणा व बागलकोटच्या सीमेवर अहेरी या नक्षली भागात जीव मुठीत धरून काम करावे लागते. त्याठिकाणी काम केल्याचा अनुभव पाठिशी असल्याने आत्मविश्वास मिळाला. कुटुंबापासून सहा-सहा महिने दूर असलेल्या सी-६० मधील जवान देशसेवा करतात. त्यांच्यासोबत राहून काम करण्याची संधी मिळाली. ते जवान खऱ्या अर्थाने आपली ताकद असल्याची खात्री पटली, असा अनुभवदेखील हिरेमठ यांनी यावेळी सांगितला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.