हाता तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला, दिवाळी साजरी करावी तरी कशी? शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

konkan : भात शेतीचे मोठे नुकसान
हाता तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला, दिवाळी साजरी करावी तरी कशी? शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
Updated on

Agriculture: संपूर्ण जगात मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जात आहे. मात्र दिवाळी साजरी करणार कशी असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. याचं कारण म्हणजे ऐन दिवाळीच्या तोंडावर पडलेला अवकाळी पाऊस.या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक वाहून गेलं असून यामुळे त्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

विक्रमगड तालुक्याला काल विजांच्या कडडातांसह आलेल्या अवकाळी पावसाने झोडपल्याने दिवाळीच्या तोंडावर भातपिक कापण्याच्या मागे लागलेल्या शेतकाऱ्यांच्या मनात पुन्हा एकदा धडकी भरवली असून राहिलेले भातपिकही हातचे जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.

ऐन दिवाळीत पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र दिवाळी सण आल्याने भात कापणीसाठी मजुरकर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची कापणीची कामे थांबली होती. भातपिक कापण्याच्या हंगामातून जाऊ लागल्याने दिवाळी आधी मागील 2 दिवसांपासून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापणीला सुरवात केली. मात्र काल संध्याकाळी 7 वाजल्यापासून पावसाने विजांच्या गडगडाटासह हजेरी लावल्याने कापलेले भातपिक भिजले असून शेतकाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

हाता तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला, दिवाळी साजरी करावी तरी कशी? शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
Agri Tourism : कृषी पर्यटनासाठी कृषी विद्यापीठाचा पुण्यातील संस्थेसोबत समंजस्य करार

सध्या विक्रमगड तालुक्यातील शीळ, ओंदे, आपटी, झडपोली, केव, म्हसरोळी, मलवाडा, दादडे, साखरे, कऱ्हे-तलावली, तलवाडा व विविध भागातील भात शेती कापनी साठी तयार झाली असून भात कापनीचा हंगाम जोरात सुरु आहे. अनेक शेतकऱ्यांनी भात कापुन शेतामध्ये ठेवले आहे. दिवाळीपुर्वी पिवले सोने घरच्या अंगनात किंवा खल्यावर नेऊन ठेवन्याचे स्वप्न बलिराजाने बघितले होते मात्र अचानक आलेल्या परतीच्या पावसाने कापलेल्या भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

हाता तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला, दिवाळी साजरी करावी तरी कशी? शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
Agri-Tech, Aquaculture संशोधनाला प्रोत्साहनाची गरज | Budget 2022 | पाहा व्हिडीओ

कापलेल्या पीक वाचवण्यासाठी शेतकरी राजाची धावपळ उडाली होती. मात्र कापलेले भात वाचवण्यासाठि चाललेली धडपड अपुरी पडली असून अनेक शेतकऱ्यांच्या कापलेल्या भात शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने भात पिकाचे नुकसान झाले तर अनेकांचे भात पिक पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेले आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतकरी रडकुंडीला आले आहेत.

या पावसाने तालुक्यातील भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हा पाऊस हिरावून घेतला आहे.

पावसाच्या भीतीने भातपिकाची कापणी केली नाही तर ते कापण्याच्या हंगामातून जाईल आणि हाती काही लागणार नाही आणि कापले तर अवकाळी पावसाने त्याचे नुकसान होऊन भाताच्या दाण्याला मोड येऊन कुजून ते खराब होऊन जाईल,अशा द्विधा मनस्थितीत शेतकरी अडकला असून मग करावे तरी काय असा प्रश्न संकटग्रस्त शेतकऱ्याला पडला आहे. कापलेले भात पीक खराब होऊन वर्ष भराची कमाई पाण्यात जाण्याची चिन्हे असल्याची चिंता शेतकऱ्या कडुन व्यक्त केली जात आहे.

हाता तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला, दिवाळी साजरी करावी तरी कशी? शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
Agri Tourism Centre : वाजगावच्या देवरे भगिणींनी साकारले नाविन्यपूर्ण कृषी पर्यटन केंद्र!

दिवाळी सण तोंडावर आला असून तालुक्यातील बहुतांश शेतकाऱ्यांची दिवाळी हि शेतात पिकलेले भातपिक झोडून ते विकून तसेच भाताचा पेंढा (पाऊली) विकून साजरी केली जाते. या येणाऱ्या पैशातून दिवाळी आपल्या मुलांसाठी दिवाळी सणाला सामान,कपडे खरेदी करतात. मात्र ऐन दिवाळीच्या तोंडावर पडलेल्या या पावसाने शेतकऱ्याचे दिवाले निघाले असून पुढे आलेला दिवाळी सण कसा साजरा करायचा हि चिंता शेतकऱ्याला सतावू लागली आहे.

मोठ्या प्रमाणात कापणी केल्यानंतर काल संध्याकाळी पडलेल्या पावसाने कापलेले पूर्ण भातपिक भिजवले आहे. तर काही भात पिक पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेले आहे. कापणी केली तर पाऊस पिक वाया घालवतो आणि कापणी नाही केली तर भातपिक जास्त पिकून वाया जाईल ही भीती असल्याणारे शेतकऱ्यांनी नक्की करावे तरी काय हाच प्रश्न पडला आहे.

सुरेश दत्तु डंबाळी

(यशवंतनगर, शेतकरी)

हाता तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला, दिवाळी साजरी करावी तरी कशी? शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
Agricuture News : तर सिंधुदुर्ग जिह्यातील २५० कृषी सेवाकेंद्रे होणार कायम स्वरूपी बंद!

या वर्षी ऐन दिवाळी मध्ये अवकाळी पावसाने विक्रमगड तालुक्यातील शेतकऱ्यांचे भात पीकाचे मोठे नुकसान झाले आहे. माझ्या शेतातील कापलेले तयार झालेल्या भात पिक भजल्याने भात पिकाची धूळधाण झाली आहे. वर्ष भराच्या उत्पादनाचे मोठे नुकसान झाले आहे.

- गजानन पाटील

(शेतकरी, विक्रमगड)

काल झालेल्या संध्याकाळच्या पाऊस व वाऱ्यामुळे माझ्या शेतातील कापणी करून शेतातले व खळ्यात ठेवलेले भात पिक भिजले आहे. असुन मोठे नुकसान झाले आहे. मी पिक विमा काढला आहे. परंतु पिका विमा मिळवण्यासाठी निकष खुप कठीण असल्याने शासनाने तातडीने भात पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करून सरसकट आर्थिक मदत दयावी.

-बबन दामोदर सांबरे

(शेतकरी, ओंदे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.