कृषिमंत्री दादा भुसे राज्य पातळीवर टीकेचे धनी

Agriculture Minister Dada Bhuse
Agriculture Minister Dada Bhuseesakal
Updated on

मालेगाव (नाशिक) : राज्याचे कृषिमंत्री (Agriculture Minister of State) दादा भुसे (Dada Bhuse) गुरुवारी (ता. २३) रात्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होत गुवाहाटी येथील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये दाखल झाले. तीन दिवस मुंबईत तळ ठोकून असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) व पक्षाची पाठराखण करणारे श्री. भुसे अंतिम क्षणी गुवाहाटीला गेल्याने पक्षाला धक्का बसला. यानंतर शुक्रवारी (ता. २४) पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत श्री. ठाकरे तसेच ज्येष्ठ नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही त्यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली. यामुळे श्री. भुसे राज्य पातळीवर टीकेचे धनी, मात्र पाठिंब्यासाठी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते म्हणतायेत म्हणी अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्याचवेळी त्यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळेल. अपेक्षेप्रमाणे खातेदेखील बदलून मिळेल, अशी चर्चा सुरू झाली आहे.

मालेगाव व परिसरातील कार्यकर्त्यांनी श्री. भुसे यांना पाठिंब्यासाठी सोशल मीडियावर ‘सदैव आपल्या सोबत, जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी, जिथे तुम्ही तेथे आम्ही, एकच वादा ओनली दादा’ यांसह विविध ओळी, म्हणी, गाणी व काव्य पक्तींचे स्टेटस ठेवले आहेत. स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी श्री. भुसे यांना एकमुखी पाठिंबा दिला आहे. याउलट खासदार संजय राऊत यांनी मात्र श्री. भुसे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. ट्विटरद्वारे त्यांनी खरीप हंगामात कृषिमंत्री प्रत्येक आठवड्यात राज्यातील पेरणीचा आढावा घेत असतात. सध्या राज्यात पाऊस कमी आहे. पेरण्या लांबत आहेत. राज्याचे कृषिमंत्री भुसे आसाम येथे चिंतन शिबिरात जाऊन बसल्याने शेतकरी वाऱ्यावर आहे. मुख्यमंत्री कृपया आपण लक्ष द्या,. अशा आशयाची टीका केली आहे.

Agriculture Minister Dada Bhuse
Maharashtra Politics : शिवसेनेत उभी फूट; शिंदे ठाकरे वाद शिगेला

श्री. राऊत यांनी भुसेंवर टिकेचे बाण सोडल्यानंतर शुक्रवारी दुपारी पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालपर्यंत सोबत असलेले व मेलो तरी सेना सोडणार नाही, असे म्हणणारेही पळून गेल्याची टीका श्री. भुसे यांचे नाव न घेता केली आहे. भुसे यांच्यासमवेत असलेल्या संजय राठोड यांना मात्र त्यांनी वाईट आरोप होऊनही मी त्यांना सांभाळलं, असे सांगतानाच खंत व्यक्त केली.

दरम्यान श्री. भुसे काल रात्री आमदार रवींद्र फाटक, आमदार संजय राठोड, सचिन नाईक यांच्यासह गुवाहाटीत पोहोचले. श्री. शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. हॉटेलवर फोटोसेशन सुरू असताना श्री. भुसे पऱ्यात उभे राहत असताना अन्य आमदारांनी त्यांना ‘दादा इकडे या’, असे म्हणत थेट श्री. शिंदे यांच्या शेजारी उभे केले. त्यावरूनच दोघांमधील जवळीक, मैत्रीची प्रचीती आली. जिल्ह्यातील शिवसेनेचे दोघे आमदार श्री. शिंदे यांच्या गोटात गेल्याने कसमादे व चांदवड, नांदगाव परिसरात शिवसेनेला काही प्रमाणात फटका बसणार आहे. त्याचवेळी हा तिढा केव्हा सुटणार... अंतिमत: नेमके काय होणार, याचीही उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे.

Agriculture Minister Dada Bhuse
महाराष्ट्राच्या राजकारणात कर्नाटकची एन्ट्री; काँग्रेसचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.