Dhananjay Munde : बोगस खतं विक्री करणाऱ्या कंपनीचा परवाना रद्द; धनंजय मुंडेंनी ट्वीट करुन दिली माहिती

Dhananjay munde
Dhananjay munde Sakal media
Updated on

मुंबईः राज्यामध्ये बोगस खतं आणि बियाणं विक्री होते त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं. कित्येकदा शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट येतं. त्यामुळे पैसा आणि वेळ दोन्हीही हातचं जातं.

बोगस खतांच्या संदर्भात धुळे जिल्ह्यातून तक्रारी आल्या नंतर कृषी विभागाने तात्काळ दखल घेत कारवाई करत, ग्रीनफिल्ड ऍग्रीकेम इंडस्ट्रीज या कंपनीचा खत विक्री परवाना निलंबित केला आहे. राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत ट्वीट करुन माहिती दिली.

Dhananjay munde
Chabad House: NIA ने पुण्यातून अटक केलेल्या दहशतवाद्याकडे छाबड हाऊसचा फोटो, यंत्रणा अलर्ट मोडवर...

धनंजय मुंडे यांचं ट्वीट

बोगस खतांच्या संदर्भात धुळे जिल्ह्यातून तक्रारी आल्या नंतर कृषी विभागाने तात्काळ दखल घेत कारवाई करत, ग्रीनफिल्ड ऍग्रीकेम इंडस्ट्रीज या कंपनीचा खत विक्री परवाना निलंबित केला आहे. बोगस खते-बियाणे यांची विक्री कृषी विभाग खपवून घेणार नाही. या कारवाईत सहभागी असणाऱ्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन, बोगस खत-बी-बियाणे यांच्याबद्दल तक्रारी असतील तर शेतकरी बांधवांनी 9822446655 या नंबरवर whatsapp करावे, ही विनंती.

Dhananjay munde
Sambhaji Bhide: "भिडे वृत्तीच्या माणसांना बोलतं करून अजित पवारांना हतबल करणं हा तर.. " किशोर कदमांचा उद्वेग

काल सभागृहात धनंजय मुंडे काय म्हणाले?

राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे पुरविण्यासाठी ‘महाबीज’चे बळकटीकरण करू. यासाठी महाबीजच्या व्यवस्थापनात लवकरच बदल करू, असे आश्‍वासन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत दिले.

तेलंगणा हे नव्याने तयार झालेले राज्य असल्याने त्यांना मिळणाऱ्या तीन टक्के अतिरिक्त निधीतून बियाणे उद्योग वाढल्याचेही मुंडे यांनी सभागृहात सांगितले. सचिन अहिर यांनी राज्यातील बियाणे उद्योग तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यात स्थलांतरित होत असल्याबाबतचा तारांकित प्रश्न उपस्थित केला. या चर्चेत विरेाधी पक्षनेते अंबादास दानवे, शशिकांत शिंदे, जयंत पाटील यांच्यासह अन्य सदस्यांनी सहभाग घेतला होता.

''विद्यापीठांच्या जमिनीवर महाबीजने बियाणे निर्मिती करावी''

शेकापच्या जयंत पाटील यांनी राज्यातील कृषी विद्यापीठांच्या जमिनींवर महाबीजने बियाणे निर्मिती करावी, अशी मागणी केली. एकट्या कोकण विद्यापीठाची पाच हजार एकर जागा आहे. ही विद्यापीठे जवळजवळ २० कोटी रुपये त्यांच्या इतर उत्पादनांमधून आणि अन्य बाबींतून कमावतात. त्यामुळे बीजनिर्मिती करणे शक्य आहे, असेही ते म्हणाले. यावर योग्य ती कार्यवाही करू, असे मुंडे यांनी म्हटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.