गडकरींनी भाषणात ऐकवलं अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं ते प्रसिद्ध वाक्य

"पेट्रोल, डिझेल सिलिंडर ज्या भावात हिंदुला मिळते, त्याचा भावात मुस्लिमाला मिळतो"
Nitin Gadkari
Nitin Gadkarisakal
Updated on

अहमदनगर: "आपल्या देशाचा विकास (country development) झाला पाहिजे. त्यासाठी पाणी, ऊर्जा, वाहतूक आणि कम्युनिकेशन व्यवस्था महत्त्वाची आहे. देशात उद्योग आणायचा असेल, तर उद्योजक विचार करतो, या चार गोष्टी आहेत का? या चार गोष्टी असतील तर उद्योग सुरु करतो" असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) आणि नितीन गडकरी अहमदनगर जिल्ह्यात कार्यक्रमासाठी एकाच मंचावर आले आहेत.

"उद्योग आला, तर भांडवली गुंतवणूक येते आणि भांडवली गुंतवणूक आली तर रोजगार निर्माण होतो. गरीब गरीब असतो, त्याला जात, धर्म, पंथ नसतो. पेट्रोल, डिझेल सिलिंडर ज्या भावात हिंदुला मिळते, त्याचा भावात मुस्लिमाला मिळतो" असे गडकरी यांनी सांगितले.

Nitin Gadkari
गडकरींच्या कामामुळे विकासाला गती; पवारांकडून गडकरींचं कौतुक

गडकरींनी आपल्या भाषणात रस्ते विकासाचे महत्त्व पटवून देण्यासाठी महाराष्ट्रात मंत्री असतानाचा एका अनुभव सांगताना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांचे वाक्य उपस्थितांना ऐकवले. त्यावेळचे माझे सचिव तांबे यांनी जॉन एफ केनेडींचे वाक्य मला दाखवले. केनेडी म्हणाले होते, "अमेरिका श्रीमंत आहे म्हणून अमेरिकेत चांगले रस्ते नाहीत. तर अमेरिकेत रस्ते चांगले झाले, म्हणून अमेरिका श्रींमत झाली"

Nitin Gadkari
ऑगस्टमध्ये व्हॉटसअ‍ॅपने बंद केले २० लाखापेक्षा जास्त भारतीय अकाऊंटस

"महाराष्ट्र सरकार ज्या ठिकाणी जागा उपलब्ध करुन देईल, त्या ठिकाणी लॉजिस्टिक पार्क, इंडस्ट्रीयल क्लस्टर आणि ट्रान्सपोर्ट नगर आम्ही आमच्या पैशाने वसवणार आहोत" असे गडकरी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.