AI Research: AI संशोधनासाठी मोठा निर्णय! विद्यापीठांना देणार 100 कोटींचा निधी; अजित पवारांची मोठी घोषणा

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासाठी आता राज्य सरकारनं पावलं टाकायला सुरुवात केली आहे.
ajit pawar
ajit pawarSakal
Updated on

Monsoon Interim Budget Session 2024 : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासाठी आता राज्य सरकारनं पावलं टाकायला सुरुवात केली आहे. त्यानुसार, विद्यापीठ स्तरांवर हालचाली सुरु झाल्या असून यासंदर्भात संशोधनासाठी विशिष्ट केंद्रं निर्माण केली जाणार आहेत. यासाठी १०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी याबाबत घोषणा केली. (AI Research 100 crores fund to Maharashtra Universities Finance Minister Ajit Pawar announcement during Interim Budget 2024)

अजित पवार म्हणाले, "शाश्वत ऊर्जा, आरोग्य तसंच कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबात अर्थात एआय संशोधनासाठी राज्यातील विद्यापीठ आणि संशोधक यांच्या संयुक्त विद्यमानानं संशोधन नवे उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यासाठी नवउपक्रम केंद्रे स्थापित करण्यात आली आहेत. त्यासाठी विद्यापीठ आणि राज्य शासनाकडून प्रत्येकी ५० कोटी रुपये असा एकूण १०० कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे"

दरम्यान, अजित पवारांच्या या घोषणेनंतर आता राज्यातील विद्यापीठांमध्ये एआयवर आधारित अभ्यासक्रमही तयार केले जाऊ शकतात. त्याचबरोबर येत्या शैक्षणिक वर्षापासून प्रत्यक्ष त्याच्या अंमलबजावणीलाही सुरुवात होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.