Exclusive interview: 'मुस्लीमांच्या राजकीय सक्षमीकरणासाठी AIMIM लढणार'

सध्या एमआयएम आगामी उत्तर प्रदेश, दिल्ली तसेच उत्तरी अनेक राज्यात निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे
imtiaj jaleel
imtiaj jaleelimtiaj jaleel
Updated on

औरंगाबाद: देशात मुस्लीम समाजाचा वापर नेत्यांनी फक्त राजकारसाठी केला. यामुळे समाजाचा मोठा तोटा झाला आहे. लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेत आज ज्या खुर्चीवर शरद पवार किंवा राहूल गांधी बसतात तिथं एखादा मुस्लीम समाजातील व्यक्तीला बसता येत नाही. देशात सध्या मुस्लीमांचे प्रतिनिधित्व करणारा फक्त एकमेव पक्ष असून एमआयएम असून आम्ही सामान्यातल्या सामान्य मुस्लीमांच्या प्रतिनिधित्वासाठी लढणार आहोत, असं मत औरंगाबादचे खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी मुलाखतीत व्यक्त केलं.

मुस्लीम समाजाच्या सक्षमीकरणासाठी लढणार-

सध्या एमआयएम आगामी उत्तर प्रदेश, दिल्ली तसेच उत्तरी अनेक राज्यात निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. या निवडणुकीत एमआयएम कोणत्या मुद्द्यांवर लढणार असल्याचे विचारले असता खासदार जलील म्हणाले, उत्तर प्रदेशात 10 टक्क्यांपेक्षा कमी असणाऱ्या यादव समाजातील मुख्यमंत्री होतो पण 20 टक्के असणाऱ्या मुस्लीम समाजातील व्यक्तीला साधे आमदार किंवा खासदार होता येत नाही. आम्ही आगामी निवडणुकीत मुस्लीम समाजाच्या राजकीय सक्षमीकरणासाठी या निवडणुका लढवणार आहोत.

धर्मनिरपेक्षतेला तडा-

दोन दिवसांपुर्वी उत्तर प्रदेशातील भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवीसी हे 'राजकीय आतंकवादी' असल्याचे गंभीर वक्तव्य केले होते. याबद्दल बोलताना खासदार जलील म्हणाले, भाजपमुळे देशातील धर्मनिरपेक्षतेला तडा गेला आहे. भाजपचे अनेक नेते, आमदार, खासदार अशी अवास्तव वक्तव्ये करतात. भाजपचे सरकार देशात आल्यापासून या नेत्यांना मोठे बळ मिळाले आहे. अशा प्रकारची वक्तव्ये देशाच्या एकतेसाठी धोकादायक आहेत.

महापालिकेतील गोंधळ आणि राज्य सरकारची उदासिनता-

औरंगाबाद जिल्ह्यातील औद्योगिक विकास इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वेगाने होताना दिसत नाही. याबद्दल विचारले असता खासदार जलील म्हणाले, महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे तसेच राज्य सरकारच्या उदासिनतेमुळे जिल्ह्याचा औद्योगिक विकास होऊ शकला नाही. जर जिल्ह्यात किंवा शहरात पायाभूत सुविधाच योग्य नसतील तर इथला औद्योगिक विकास कसा होणार हा प्रश्नही खासदार जलील यांनी उभा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.