Air Pollution : राज्यातील कोणत्या शहरातील हवा सर्वात दूषित? जाणून घ्या प्रदुषणाची परिस्थिती

देशातील अनेक शहरात हवेची गुणवत्ता ढासळली आहे
Air Pollution
Air Pollution
Updated on

देशातील अनेक शहरात खालवलेली हवेची गुणवत्ता हा मागील बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. दिल्ली-एनसीआर परिसरात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हवेच्या गुणवत्तेने गंभीर पातळी ओलांडली असून नागरिकांना श्वास घेणेही कठीण झाले आहे. महाराष्ट्रात देखील अनेक शहरांमध्ये हवेती गुणवत्ता ढासळल्याचे पाहायला मिळत आहे.

देशात सर्व दिवाळीची धामधूम सुरू आहे दुसरीकडे देशातील अनेक प्रमुख शहरांचा श्वास प्रदूषित हवेमुळे घुसमटल्याचे पाहायला मिळत आहे. राजधानी दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळूर आणि चेन्नई या मेट्रो शहरात हवा मोठ्या प्रमाणात दूषित झाली आहे.

राज्यात देखील पुणे, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्येही हवेचा दर्जा प्रचंड खालावला आहे. आज आपण राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये हवेची गुणवत्ता किती होती ते जाणून घेणार आहोत.

Air Pollution
Air Pollution: मुंबईपेक्षाही पुण्याची खराब स्थिती; दोन दिवसांत प्रदूषणात मोठी वाढ, पुण्याची फुप्फुसे भरली अशुद्ध हवेने

राज्यातील हवा प्रदुषणाची काय परिस्थिती?

—————

(सकाळी ८ वाजता)

अकोला - १८० (पीएम १० प्रदूषक मात्रा अधिक)

अमरावती - १०७ (पीएम १० प्रदूषक मात्रा अधिक)

संभाजीनगर - १४६ (पीएम १० प्रदूषक मात्रा अधिक)

चंद्रपूर - २१५ (पीएम २.५ प्रदूषकाची मात्रा अधिक)

जळगाव - १३८ (पीएम १० ची मात्रा अधिक)

कोल्हापूर - १७९ (पीएम १०)

नागपूर - २०० (पीएम २.५)

नाशिक - १७६ (पीएम २.५)

मुंबई (सायन) - १३७ (पीएम १०)

नवी मुंबई - २०६ (पीएम १०)

पुणे - २६३ (पीएम २.५)

सोलापूर - २९५ (पीएम २.५)

Air Pollution
Accident News: हृदयद्रावक! दिवाळीच्या सुट्टीत फिरायला गेले अन्.. भीषण अपघातात जळगावातील शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपलं

हवेचा गुणवत्ता निर्देशांक किती असावा?

शून्य ते ५० एक्यूआय - उत्तम

५० ते १०० एक्यूआय - समाधानकारक

१०१ ते २०० एक्यूआय - मध्यम

२०१ ते ३०० एक्यूआय - खराब

३०१ ते ४०० एक्यूआय - अतिशय खराब

४०१ ते ५०० एक्यूआय - गंभीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.