नवी दिल्ली : मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या हभप अजय बारस्कर यांची प्रहार जनशक्ती पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली आहे. बारस्कर यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत जरांगे हे हेकेखोर असून त्यांनी मराठ्यांचं नुकसान केल्याचे आरोप केले होते. त्यानंतर जरांगेंनी माध्यमांशी संवाद साधताना बारस्कर हे सरकारचं प्याद असल्याचं सांगत हा महाराज नसून भोंदू बाबा असल्याचं म्हटलं होतं. (ajay barskar has to make serious accusations against manoj jarang prahar janshakti party dismissed him)
प्रहारनं प्रसिद्ध केलेल्या पक्षादेशात काय म्हटलं?
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू याचा आदेश आहे की, पक्षातील कोणीही मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या मराठा आरक्षणाविषयी किंवा इतर आरक्षण किंवा नेत्यांबद्दल कोणीतीही भूमिका मांडू नये, असं केल्यास त्यांचा पक्षाशी कुठलाही संबंध राहणार नाही. (Latest Marathi News)
कुठल्याही विषयावर पक्षाची अधिकृत भूमिका अध्यक्ष बच्चू कडू हे स्वतः मांडतील. इतर कोणीही अध्यक्षांच्या मान्यतेशिवाय आपली भूमिका मांडू नये. आज अजय महाराज बारस्कर यांनी मनोज जरांगेंबाबत जी भूमिका मांडली त्याच्याशी प्रहार जनशक्ती पक्ष किंवा प्रहार वारकरी संघटना समर्थन करत नाही. (Marathi Tajya Batmya)
पण बारस्कर यांना प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार वारकरी संघटनेमधून बडतर्फ करण्यात येत आहे. त्यांचा पक्षाशी आजपासून काहीही संबंध राहणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.