Ajay Maharaj Baraskar On Jarange : कोणत्या माऊलीला अंबडच्या आमदारकीचा शब्द दिला? बारस्करांनी जरांगेवर केले 'हे' मोठे आरोप

Ajay Maharaj Baraskar On Manoj Jarange : अजय महाराज बारस्कर यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
Ajay Maharaj Baraskar serious allegations on Manoj Jarange Maratha reservation latest marathi news
Ajay Maharaj Baraskar serious allegations on Manoj Jarange Maratha reservation latest marathi news esakal
Updated on

Ajay Maharaj Baraskar On Manoj Jarange Latest News : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडून मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरूच आहे. यादरम्यान अजय महाराज बारस्कर यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

काही दिवसांपूर्वी अजय बारस्कर यांनी केलेल्या आरोपांना मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार प्रत्तुत्तर दिलं होतं. जरांगे पाटील यांनी देखील बारस्करांवर अनेक गंभीर आरोप केले होते. यानंतर बारस्करांनी आज पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. कुठल्यातरी महिलेला जरांगेंनी अंबडचा आमदार करण्याचा शब्द दिल्याचा आरोपही बारस्कर यांनी यावेळी केला.

अजय महाराज बारस्कर म्हणाले की, मी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर प्रश्न उपस्थित केले. मी व्यक्तिगत आरोप केले नाही. मराठा आरक्षणाबाबत प्रश्न होते. जरांगे पाटील वारंवार पलटी मारत होते. जरांगे पाटील यांचा अभ्यास कमी आहे, कायद्याचं ज्ञान नाही. एका कुटुंबाला जरांगेच्या सूचनेमुळे केलेल्या आंदोलनामुळे जेल जावे लागले. जरांगे पाटील यांचा स्वभाव हा अहंकारी आहे. त्यांचा मी पणा यावर मी बोट ठेवलं.

जरांगे पाटील यांनी माझा प्रश्नावर काय उत्तर दिले, तर त्यांनी माझावर बलात्कार व विनयभंगाचे आरोप केले. जरांगेकडे माझा प्रश्नाची उत्तर नाही म्हणून माझावर आरोप केले. मी ३०० कोटीची मालमत्ता जमा केल्याचा आरोप केला, तसेच मी ४० लाख घेतले असा आरोप केला. एखाद्या सज्जन माणसावर या पूर्वी एकही आरोप नाही. माझावर दोन गुन्हे आहेत. माझं जाहीर आवाहन आहे. जर का माझी ३०० कोटीची मालमत्ता आहे तर मी ४० लाख का घेईन?

Ajay Maharaj Baraskar serious allegations on Manoj Jarange Maratha reservation latest marathi news
Jitendra Awhad : आव्हाडांची तुतारी वाजली पण... एक लाखांच बक्षीस जाहीर करणाऱ्या मिटकरींनी घातला घोळ

नुसते माझावरचं नाही तर माध्यमांवरही आरोप केले. जरांगेसाठी माध्यमं तिथे जमलेली नाही तर समाजासाठी जमलेली आहेत. त्या पुढे जाऊन ते म्हणाले बारसकर आणि आमच्या आंदोलनाचा संबध नाही. मूळात जरांगे पाटील यांनी मला बोलावले, माझाकडे तसा पुरावा आहे, असेही अजय महाराज बारस्कर म्हणाले.

मी पण मराठा आहे मराठ्याना आरक्षण मिळावं ही माझीही इच्छा आहे. जरांगे पाटलांच्या कोर कमिटीही तिथे होती. त्यानाही ते सहन झालं नसावं. जरांगेंनी संतांचा व माझा अपमान केल्यानंतर माझी माफी त्या कोअर कमिटीने फोनवरून मागितली. माझाकडे पुरावे आहेत असे बारस्कर यावेळी म्हणाले. (जरांगे यांच्या कोर कमीटीकडून माफी मागितल्याची ऑडीओ बारस्कर महाराज यानी ऐकवला)

Ajay Maharaj Baraskar serious allegations on Manoj Jarange Maratha reservation latest marathi news
Ajay Barskar: "जरांगेंनी तुकोबांची मागितलेली माफी अहंकारमिश्रीत"; बारस्करांची पुन्हा कडवी टीका

योग्यवेळी मे ते पुरावे सादर करीन असेही बारस्कर यावेळी म्हणाले. लोणवळ्या मध्ये बंद दाराआड नेमकी चर्चा काय झाली, त्यावर ते म्हणतात मला गार लागत होतं. मग मिडियावाले का आत नाही घेतले, त्या बंद दाराआड काय डील झाली. वाशीत ३६ तास हा थांबून राहीला...वाशीच्या सभेत ६ मागण्या केल्या...

१४ तारखेच्या सभेत काय मागणी होती, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीत समावेश करावा, पाथर्डीतील घटनेतील आरोपीला फाशी देण्यात यावी. मात्र लोणावळ्यातील बंद दाराआड चर्चेनंतर जरांगे पाटील यांचे सूर बदलले, आधी सरसकट मागणी होती मग सगेसोयरेची मागणी का घेतली. सगेसोयरे हा विषय अंतरवलीतून निघताना नाही तर दुसऱ्या उपोषणापासून सुरू झालाय, जेव्हा दोन न्यायमूर्ती आणि चार मंत्री आले होते तेव्हापासून आहे. जे ५४ बांधव ज्यांनी मराठा समाजासाठी आत्महत्या केली त्यांना सरकारी नोकरीची मागणी गेली कुठे? तेरा मागण्या अद्याप कायम आहेत. आत्महत्या केलेल्या कुटुंबीयांना नोकरी द्या ही मागणी सुरूच आहे.

काल माझावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. तो जरांगे पाटील यांच्याच सांगण्यावरून झाला. माझी मागणी आहे जरांगेंनी माझावर आरोप केलेत की मी बलात्कार केला विनयभंग केला त्याचा पुरावा दया असेही बारस्कर यावेळी म्हणाले.

मी आरक्षणाचे प्रश्न विचारले, व्यक्तीगत प्रश्न विचारले का? मागच्या १७ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे, तू रात्री कोणाच्या घरात जाऊन दूध भात- दूध भाकरी खात होता? माझ्याकडे पुरावे नाहीत का? कोणत्या माय माऊलीकडून पाय दाबून घेतले याचे माझ्याकडे व्हिडीओ रेकॉर्डींग आहे. कोणत्या माता माऊलीला तू अंबडचा आमदार बनवण्याचा शब्द दिलाय तेही आम्हाला माहिती आहे. पण आमची ती संस्कृती नाही. आम्ही सामाजिक पश्नावर आवाज उठावला. डील काय झाली आम्हाला माहितीतेय असेही बारस्कर यावेळी म्हणाले.

Ajay Maharaj Baraskar serious allegations on Manoj Jarange Maratha reservation latest marathi news
Grain Storage: PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी सुरू केली जगातील सर्वात मोठी 'गोदाम योजना'; असा होणार लाभ

कुणाच्या सांगण्यावरून २० तारखेचं आंदोलनं केलं, जरांगे पाटील यांनी पलटी का मारली? जरांगेवर आता विश्वास नाही. जरांगे पाटील म्हणतत मी बोलतो म्हणजे ट्रॅप आहे. मी जरांगे पाटलांवर मागच्या पत्रकार परिषदेत कोणतेही आरोप केले नाही. मी नार्को चाचणीसह इतर चाचण्यांना सामोरे जायला तयार आहे.

जरांगे पाटील हे माझा नंतर आलेत त्यांनी माझावर ४० मिनिटं खर्च केलेत, उद्या ११ वाजता याच ठिकाणी बॉम्बस्फोट होईल. उद्या इथे जरांगे कसा आहे, त्याचं सत्य बाहेर येईल. जरांगेचे काळे धंदे समोर आले की, समाजचं त्यांना दगड मारतील. जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा राजकीय फायदा होण्यासाठीच हे आंदोलन सुरू असून जरांगे पाटील यांचं आंदोलन भरकटलं आहे, असेही बारस्कर यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.