Aditya Thackeray: अजित पवारांच्या शपथविधीवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले, राजकारणातल्या गलिच्छ...

Aditya Thackeray
Aditya ThackeraySakal Digital
Updated on

Aaditya Thackeray Reaction On Ajit Pawar Join Shinde Government

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी आज पक्षात बंड घडवून आणत सत्ताधारी भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेसोबत जावून सरकारमध्ये सामील झाली. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. मात्र हे बंड शरद पवारांना दूर ठेवून घडवून आणण्यात आल्याचं समोर आलं. यावर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Aditya Thackeray
Sharad Pawar: पुतण्याने साथ सोडली, हक्काचे माणसं सोडून गेले, मात्र हे नेते आजही शरद पवारांच्या पाठीशी उभे

आदित्य ठाकरे म्हणाले की, आजच्या राजकारणातल्या गलिच्छ परिस्थितीवर भाष्य न करता काही महत्वाचे प्रश्न. मंत्रिमंडळ विस्तार झाला, आधीच फेल डबल झालेल्या इंजिनाला अजून एक चाक लागलं. चला, पण ज्या गद्दारांना मंत्रीपदाची स्वप्नं पडत होती, त्यांना १ वर्ष उलटल्यावरही काय मिळालं?

रायगड असो, नाशिक असो, जळगाव असो... जे गद्दार स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांचा त्रास होतोय असं सांगत होते, आता राष्ट्रवादीच्या त्याच नेत्यांना मंत्रीपदं मिळाल्यावर ह्यांचं काय होणार? आता पुन्हा गुवाहाटी?

Aditya Thackeray
Ajit Pawar NCP : महाराष्ट्रात 2019 च्या निवडणुकीनंतर राजकीय भूकंपांची माळ

एक गद्दार टीव्हीवर म्हणाले, १४५ जागा जिंकायच्या असतील तर ह्यांना सोबत घ्या, असं वरिष्ठांनी सांगितलं. म्हणजे हे सिद्ध झालंय की मिंधेंकडे क्षमताच नाही! नाहीतर एवढं गद्दारांचं बहुमत असताना आजचा कार्यक्रम कशाला? आणि सर्वात महत्वाचं...आम्ही कॉंग्रेस आणि NCP सोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं, असं म्हटलं गेलं.

मग आज भाजपाने काय केलं? तेही सत्तेसाठी आकड्यांची गरज नसताना...एक सिद्ध झालं, तुमच्या गद्दारीमागे फक्त आणि फक्त स्वार्थ आहे! 'स्वार्थी विरुद्ध स्वाभिमानी', अशी ही लढाई असणार आहे!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.