Ajit Pawar Birthday : पुन्हा बॅनर पुन्हा चर्चा! खरंच 'चाणक्य' अन् दादांची दोस्ती तुटायची नाय?

ajit pawar and devendra fadnavis birthday wishes Friendship banners by ncp workers in nagpur politics
ajit pawar and devendra fadnavis birthday wishes Friendship banners by ncp workers in nagpur politics
Updated on

राज्याचे दोन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा आज (२२ जुलै) वाढदिवस आहे. या पार्श्वभूमिवर नागपूरात लावण्यात आलेल्या पोस्टरची सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे त्यांच्या समर्थक आमदारांसह भाजप-शिवसेना सरकारमध्ये सामील झाले, त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना ही दोस्ती तुटायची नाय असे बॅनर लावत वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून नागपूरात हे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर "ही दोस्ती तुटायची नाय" असं लिहून त्याखाली "राजकारणातील ‘दादा’ अजीत दादा, राजकारणातील ‘चाणक्य’ देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा" असा संदेश देण्यात आला आहे. या बॅनरची सध्या नागपूरमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.

ajit pawar and devendra fadnavis birthday wishes Friendship banner
ajit pawar and devendra fadnavis birthday wishes Friendship banner
ajit pawar and devendra fadnavis birthday wishes Friendship banners by ncp workers in nagpur politics
Maharashtra Politics : अजित पवार मुख्यमंत्री होणार? CM शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची घेणार भेट

'चाणक्य' अन् दादांची दोस्ती तुटायची नाय?

शिंदे-फडणवीस सकारमध्ये सामिल झालेले अजित पवार दिल्लीत झालेल्या एनडीएच्या बैठकीला देखील उपस्थित होते. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुका देखील ते पीएम नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढणार आहेत. तसेच यापूर्वी देखील अजित पवार यांनी फडणीसांना साथ देत पहाटे उपमुख्यमंत्रपदाची शपथ घेतली होती, मात्र थोड्याच वेळात त्यांनी माघार घेतली.

त्यानंतर आता पुन्हा एकदा अजित पवार बंड करत त्यांच्यासोबत गेले आहेत. त्यामुळे खरंच यापुढे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची दोस्ती तुटणार नाही का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे.

ajit pawar and devendra fadnavis birthday wishes Friendship banners by ncp workers in nagpur politics
Mohan Bhagwat News : राजा देश सांभाळतो पण काही चुकलं तर…; मोहन भागवतांचा रोख कुणाकडे?

मिटकरींचं ट्वीटही चर्चेत

यापूर्वी अजित पवार गटातील नेते अमोल मिटकरी यांनी एक व्हिडीओ ट्वीट करत दिलेल्या शुभेच्छांची देखील सर्वत्र चर्चा होत आहे. अजित पवार लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असे उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले, त्यानंतर अमोल मिटकरी यांनी देखील अशाच आशयाचं ट्वीट केलं.

वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अमोल मिटकरी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ ट्विट केला. या व्हिडिओला त्यांनी 'मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की......! लवकरच #अजितपर्व' असे कॅप्शन दिले.यावरून देखील चर्चेला उधाण आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.