सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी घेतली अजित पवारांची भेट घेतली. देवगिरी बंगल्यावर घेतली भेट.
"स्व"त्व विसरलेली जनता "तत्व" नसलेले राजकारणी घडविते. स्वतःची शक्ती ओळखा. कुणालाही गृहीत धरू देऊ नका. नवक्रांतीची मशाल पेटवा, स्वाभिमान जागवा आणि स्वराज्य घडवा !
असं ट्वीट संभाजीराजे यांनी केलं आहे.
अजित पवार यांनी विधान परिषद विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला, हे पक्षाला कळवलं असतं तर बरं झालं असतं. असं विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे.
वाट आहे संघर्षाची... म्हणून थांबणार कोण? सह्याद्री सोबत आहे महाराष्ट्र सारा दऱ्या खोऱ्यातून अन् गाव शिवारातून वाहणारा वारा... मग संघर्षाला घाबरतंय कोण? लढणं आणि जिंकणं हे तर महाराष्ट्राच्या रक्तातच...
प्रत्येक बॅनरवर शरद पवारांचा फोटो पाहिजेच, असा निर्णय अजित पवारांनी घेतलेल्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक नुकतीच संपन्न झाली. 'देवगिरी'वरील बैठकीला अजित पवार यांच्यासह पक्षाच्या मोठ्या नेत्यांची उपस्थिती होती.
अजित पवारांच्या बंडानंतर थोड्यात वेळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पत्रकार परिषद घेणार आहेत.
ज्या माणसाने एवढं सगळं दिलं त्या माणसाला अशा परिस्थिती आणून ठेवणं चुकीचं आहे. आता इथून पुढे आमदारांसाठी माझा व्हिप चालणार आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
पत्रकार परिषदेत काय म्हणाले शरद पवार?
ईडीच्या चौकशीमुळे काही आमदार अस्वस्थ होते. मोदींच्या वक्तव्यानंतर त्यांची अस्वस्थता आणखी वाढली.
देशातील सर्व महत्वाच्या नेत्यांचे फोन आले. उद्धव ठाकरे यांच्याशीही फोनवर चर्चा झाली.
शपथविधी समारंभात अनेकांचे चेहरे चिंताजनक होते.
पक्ष फुटला असे मी कधीच म्हणणार नाही
आम्ही न्यायालयात जाणार नाही, जनतेत जाणार आहोत.
तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाई करणार
राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांच्या राजकीय भविष्याची काळजी
महाविकास आघाडी एकत्र काम करणार
जे घडले त्याची चिंता नाही.
अजित पवारांनी ट्वीटरच्या 'बायो'मध्ये बदल केला असून 'डेप्युटी चिफ मिनिस्टर, महाराष्ट्र' असा उल्लेख त्यांनी केला आहे. शिवाय त्यांनी 'एनसीपी लिडर' हे कायम ठेवलं आहे.
जयंत पाटलांच्या घरी हालचालींना वेग. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड जयंत पाटलांच्या भेटीला. अनेक राष्ट्रवादीचे पदाधिकारी जयंत पाटलांच्या भेटीला जात आहेत.
शरद पवार परिस्थितीवर लक्ष ठेवून असून शरद पवारांची भूमिका माहविकास आघाडी बरोबर ठाम असल्याचं सांगितलं जात आहे.
शरद पवारांच्या गुगलीवर सिक्सर ! देवेंद्र फडणवीस यांच्या यॉर्करवर राष्ट्रवादीचा त्रिफळा उडाला. उध्दव ठाकरे हिट विकेट आणि संजय राऊत स्वत:च्या पायात अडकून पडून रन आऊट, असं ट्वीट नारायण राणे यांनी केलं आहे.
अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ यांनी शपथ घेतली. त्यानंतर दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ यांनी शपथ घेतली. त्यानंतर आता दिलीप वळसे पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
शपथविधीसाठी राज्यपाल राजभवनात दाखल होत आहेत
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. 'साम टीव्ही'ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे राजभवन येथे आगमन झाल्यानंतर काही वेळातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही मुंबईतील राजभवनात पोहोचले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही यावेळी उपस्थित होते.
VIDEO | Maharashtra CM Eknath Shinde also reaches Raj Bhavan in Mumbai shortly after NCP leader Ajit Pawar arrived there. Deputy CM Devendra Fadnavis also present. pic.twitter.com/b80oJLb5wI
— Press Trust of India (@PTI_News) July 2, 2023