Ajit Pawar: अजितदादा नाराज की आजारी? सलग तिसऱ्या दिवशी सर्व कार्यक्रम अधांतरी; आज बैठकीला हजर राहणार का?

अजित पवारांनी पुणे, पिंपरी आणि बुलढाण्यातील तीन कार्यक्रम रद्द केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे
Ajit Pawar
Ajit PawarEsakal
Updated on

जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचे पडसाद राज्यात सर्वत्र उमटताना दिसत आहेत. राजकीय वर्तुळात देखील या घटनेमुळे आरोप प्रत्यारोपांना उधाण आले आहे. यादरम्यान जालन्यातील घटनेमुळे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

अजित पवारांनी पुणे, पिंपरी आणि बुलढाण्यातील तीन कार्यक्रम रद्द केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. अशातच काल(रविवारी) राज्य सरकारचा बुलढाणा येथे 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर राहिल्याने या चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान या कार्यक्रमात खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांनी या चर्चांना विराम दिला.

दरम्यान आजही आज सलग तिसऱ्या दिवशी देखील अजित पवारांचे सगळे कार्यक्रम अधांतरी ठेवण्यात आल्याची माहिती आहे. गेल्या २ दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेतलेला नाही. जालन्यातील घटनेनंतर महायुतीतील राष्ट्रवादी नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर अजित पवारांची प्रकृती ठीक नसल्याची माहिती काल कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Ajit Pawar
Talathi Exam: तलाठी परीक्षा नियोजित वेळतच होणार; आयोजन संस्थेने विद्यार्थ्यांना केला मेल

तर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थित सह्याद्रीवर १२ वाजता मराठा आरक्षणासंदर्भात महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला देखील अजित पवार उपस्थित राहण्याची शक्यता अगदी कमी असल्याची चर्चा आहे. बुलढाण्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रम, पुण्यातील विविध कार्यक्रमांना गैरहजर राहिल्यानंतर आजच्या बैठकीला अजित पवार हजर राहणार का ? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Ajit Pawar
Sharad Pawar: 'शरद पवार यांच्याशी माझा आजही फोनवर संपर्क', अजित पवार गटाच्या नेत्याच्या दाव्याने भुवया उंचावल्या

अजित पवारांची तब्येत ठिक नाही- एकनाथ शिंदे

अजित पवारांची तब्येत कालपासून बरी नाहीये. पण लोक सुरू करतील दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर, असं काही नाही आमच्यामध्ये एकदम फेवीकॉलचा मजबूत जोड आहे. हे सरकार घट्ट आहे. या सरकारला कुठेही अडचण नाहीये असे मुखमंत्री एकनाथ शिंदे काल शासन आपल्या दारी या कार्यक्रमात बोलताना म्हणाले आहेत.

Ajit Pawar
Weather Update : राज्यातील 'या' जिल्ह्यांना आज यलो अलर्ट; पुढील ३ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.