Ajit Pawar : गडकिल्ल्यांवर दारू पिऊन जाल तर खबरदार! वाघनखांच्या उद्घाटन प्रसंगी अजित पवारांनी केली नव्या कायद्याची घोषणा

Wagh Nakhe return from britan : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा येथील कार्यक्रमात बोलताना राज्यातील गडकिल्ल्यांबाबत एक मोठी घोषणा केली आहे
Ajit Pawar
Ajit Pawar
Updated on

छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर केलेल्या शौर्याचे प्रतीक असलेली वाघनखे साताऱ्यात ठेवण्यात आली आहेत. आज साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या वाघनखांच्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन करण्यात आले. दरम्यान या कार्यक्रमादरम्यान बोलताना राज्यचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गड किल्ल्यांबद्दल मोठी घोषणा केली.

अजित पवार म्हणाले की, आजचा दिवस हा खूप महत्वाचा आहे, वाघनखांबाबत मागील अनेक दिवस चर्चा सुरू आहे. काही चागले घडत असेल तर काही जन टीका-टिप्पणी करतात, जे टीका करतात ते लंडनला गेले की कोहिनूर हिरा बघतात आणि वाघनखे बघतात. पण इथे आले की टीका करतात. ही वाघनखे प्रेरणादायी अशी वाघनखे आहेत. एकदा का होइना वाघनखे बघा, अफजल खानाचा कोथळा शिवाजी महाराज यांनी त्या वाघनखानी काढला असा सल्ला देखील अजित पावारांनी टीका करणाऱ्यांना दिला.

Ajit Pawar
Puja Khedkar : पोलिसांच्या पाठोपाठ पूजा खेडकरवर UPSCची मोठी कारवाई! आयएएस पद जाणार?

अजिंक्य ताऱ्याला १० कोटी दिले ते खर्च करा, जवळपास ५०० कोटी रुपये राज्य सरकारने उपलब्ध करून दिले आहेत. पुन्हा येणाऱ्या सरकारमध्ये महायुतीचे सरकार आणावे लागेल, तर कायमच्या योजना आणल्या जातील. काही जण म्हणतात चुनावी जूमला आहे, अरे कशाचा जुमला? हे सरकार सर्व सामन्यासाठी काम करत आहे, अशा शब्दात अजित पवारांनी विरोधकांना खडसावले.

महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे, माझी लाडकी बहिण योजना आपण दिलेली आहे. पण काहीना काही टीका करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. मध्ये म्हणायचे बहिणीला दिलं भावाला काही दीले नाही असा टोला देखील अजित पवारांनी विरोधकांना लगावला. यासोबतच किल्ल्यावर दारू पिऊन जाणाऱ्यांविरोधात कडक कायदा केला जाणार आहे, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

Ajit Pawar
Donald Trump : ट्रम्प यांचा गोतावळा लै मोठा! दोन घटस्फोटांनंतर केलंय तिसरं लग्न; 'इतकी' आहेत मुलं अन् नातवंडं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.