उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सकारात्मक निर्णय घेऊ; अजित पवार

स्वर्गीय आमदार चंद्रकांत जाधव यांच्या घरी भेट देऊन जाधव कुटुंबीयांचे सांत्वन केले.
Ajit Pawar
Ajit Pawarsakal
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीबाबत सर्वांना विश्वासात घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केला. तर कॉग्रेस पक्ष जाधव कुटूंबाच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे, असा आधार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan)यांनी दिला.

उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज स्वर्गीय आमदार चंद्रकांत जाधव यांच्या घरी भेट देऊन जाधव कुटुंबीयांचे सांत्वन केले व दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, जयश्री जाधव, संभाजी जाधव, सत्यजित जाधव यांच्यासह जाधव कुटुंबियातील इतर सदस्य उपस्थित होते.

Ajit Pawar
मोदींबद्दलचं वक्तव्य पटोलेंच्या अंगाशी येणार; चंद्रकांत पाटलांचा सूचक इशारा

कोल्हापूर उत्तरच्या जागेवर 2019 मध्ये काँग्रेसचे चंद्रकांत जाधव हे विजयी झाले होते जाधव यांचे दोन डिसेंबरला निधन झाल्याने रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीत उत्तरच्या जागेबाबत कोणता निर्णय होतो यावर भाजपचा अंतिम उमेदवार ठरणार आहे. या जागेसाठी भाजपकडून माजी जिल्हाध्यक्ष व पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव हे दावेदार आहेत. याचबरोबर माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी ही सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा काय निर्णय होतो याकडे लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.