Ajit Pawar: काटेवाडी गावात अजितदादा विरुद्ध भाजप लढत; तर अजितदादांच्या मातोश्रींनी व्यक्त केली इच्छा म्हणाल्या, 'मुख्यमंत्री..'

अजित पवार मतदानाला राहणार गैरहजर
Ajit Pawar
Ajit PawarEsakal
Updated on

आज राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.पुणे जिल्हयातील २३१ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका तर १५७ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका होणार आहेत.बारामती तालुक्यात अजित पवार यांचे गाव असलेल्या काटेवाडी मध्ये ग्रामपंचायतची निवडणूक होत आहे या निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काटेवाडी गावात गेल्या अनेक वर्षापासून ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे.

तर आज सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मातोश्री आशाताई पवार यांनी मतदान केलं. तर आज मतदानासाठी अजित पवार काटेवाडीत मतदानसाठी येणार नाहीत अशी माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी आहेत. त्यामुळे ते येणार नसल्याची माहिती आहे.

Ajit Pawar
Nagpur : तर अनेक नेते अडचणीत येतील ‘एल्विश’वरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना इशारा

डेंग्यूच्या आजारपणामुळे अजित पवार काटेवाडीत मतदानसाठी येणार नाहीत. तर आज सकाळीच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी ग्रामपंचायतसाठी मतदान केलं आहे. अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी देखील यावेळी मतदान केलं आहे. मात्र आजारपणामुळे अजित पवार मतदानासाठी उपस्थित राहणार नाहीत. यावेळी माध्यमांनी अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांच्याशी संवाद साधला.

Ajit Pawar
Lalit Patil Drug Case : ललित पाटीलकडून तीन किलो सोने जप्त; पुणे पोलिसांकडून नाशिकमध्ये कसून चौकशी

माझ्यासमोरच मुलाने मुख्यमंत्री व्हावा असं मला वाटतं - आशाताई पवार

मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आलेल्या अजित पवारांच्या आई आशाताई पवार यांनी पत्रकारांनी अजित पवारांच्या मुख्यमंत्री होण्याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, 'माझ्यासमोरच मुलाने मुख्यमंत्री व्हावा असं मला वाटतं. लोक दादांवर प्रेम करतात. पण पुढचं काय सांगता येत नाही, अजितदादांवर लोकांचा खूप प्रेम आहे. पण पुढचं काय सांगावं. सर्वांना वाटतं अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावे. माझंही आता वय झालं आहे. त्यामुळे माझ्या डोळ्यांसमोरच दादांनी मुख्यमंत्री व्हावं', अशी इच्छा आशाताई पवार यांनी बोलून दाखवली.

Ajit Pawar
Maharashtra politics : राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन गट आमने-सामने; अजित पवार गटाने मागितली मुदतवाढ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.