ajit pawar, CM
ajit pawar, CMesakal

Ajit Pawar: "अजित पवार उद्याचे मुख्यमंत्री", शिंदे गटाच्या नेत्याचं विधान

संभाजीनगरमध्ये आज होणार महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा
Published on

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज होणारी महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे. या सभेला महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. पण खरी लढत ही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दरम्यान सभेपूर्वीच शिवसेनेच्या आमदाराने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. आमदार संजय शिरसाट म्हणाले की, आम्ही उद्धव ठाकरेंना पाहिलं आहे. जे मोदी-शहा यांच्या मांडीला मांडी लावून बसत होते.

ajit pawar, CM
BJP Leader: मोठी बातमी! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या

मात्र शरद पवारांनी त्यांची जागा दाखवली, त्यांनी तुम्हाला कोणा बरोबर बसण्याची वेळ आणली, या सभेची उद्धव ठाकरेंना गरज आहे. ते संध्याकाळी विमानाने सगळं वऱ्हाड घेवून येणार आहेत. उद्धव ठाकरेंना लोकांचा फायदा करून घेण्याची सवय आहे, मात्र याचा फायदा राष्ट्रवादीला होणार आहे.

उद्याचा मुख्यमंत्री कोण असं विचारल तर लगेच उत्तर येणार अजित पवार, उद्धव ठाकरे का नाहीत असं विचारलं तर म्हणातील त्यांचं काय राहिलं आहे. या भावनिकतेचा फायदा अजित पवारांना होणार आहे. असं म्हणत त्यांनी टीका केली आहे.

ajit pawar, CM
Sambhajinagar Violence : "राष्ट्रवादीने जाणीपूर्वक दंगल पेटवली"; भाजप खासदाराने सांगितला संपूर्ण घटनाक्रम

दरम्यान आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यासह इतर प्रमुख नेते या सभेला उपस्थित राहणार असल्यानं या सभेकडं राज्याचं लक्ष लागलं आहे. गेल्या काही दिवसांपासून या सभेवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून, विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()