'जनतेवर अन्याय व्हावा, असं सरकारला वाटत नसतं'; बारसु प्रकल्पावर अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका

'जनतेवर अन्याय व्हावा, असं सरकारला वाटत नसतं'; बारसु प्रकल्पावर अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका
Updated on

Ajit Pawar on Barsu Refinery : कोकणातल्या बारसु येथे होणाऱ्या रिफायनरीला ठाकरे गटाचा कडाडून विरोध आहे. परंतु खुद्द विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बारसु प्रकरणात वेगळी भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे.

आज पत्रकारांशी बोलतांना अजित पवार यांनी मोठे प्रकल्प यावेत, अशी भूमिका व्यक्त केली असून त्यामुळेच एक लाख लोकांना रोजगार मिळू शकतो, असं म्हटलं आहे.

'जनतेवर अन्याय व्हावा, असं सरकारला वाटत नसतं'; बारसु प्रकल्पावर अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका
Aditya Thackeray : …इथे गद्दारीला स्थान नाही; बाजार समिती निवडणूक निकालांवरून आदित्य ठाकरे कडाडले!

यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले की, कुठल्याच सरकारला जनतेवर अन्याय व्हावा, असं वाटत नसतं. सुरुवातीला हा प्रकल्प नाणारला होणार होता. परंतु तिथे विरोध झाल्याने बारसुला होत आहे.

मुळात ठाकरे गटाच्या स्थानिक लोकप्रतिनिधींचा या प्रकल्पाला पाठिंबा आहे. येथे होणारा विरोध खरंच स्थानिकांचा आहे का? बघावं लागेल. अनेक एनजीओ आंदोलनात उतरल्याची माहिती असल्याचं अजित पवार म्हणाले.

काय म्हणाले अजित पवार?

  • कुठल्याच सरकारला जनतेवर अन्याय व्हावा, असं वाटत नाही

  • हा प्रकल्प नाणारला होणार होता. आता बारसुला होतोय

  • मी पुन्हा बारकाईने माहिती घेत आहे

  • स्थानिक लोकप्रतिनिधींचा प्रकल्पाला पाठिंबा आहे

  • जे ठाकरे गटाचे आहेत, त्यांचा प्रकल्पाला पाठिंबा आहे

  • सरकारने संवेदनशीलपणे समस्या सोडवायच्या असतात

  • खरंच स्थानिकांचा किती विरोध आहे, एनजीओ किती उतरल्या आहेत

    आणि बाहेरचे लोक किती उतरले आहेत, हे बघावं लागेल

  • बेरोजगारी दूर करायची असेल तर मोठे प्रकल्प आणले गेले पाहिजेत

  • या प्रकल्पातून एक लाख तरुण-तरुणींना रोजगार मिळू शकतो

  • हे करत असतांना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, याची काळजी घेणं आवश्यक आहे

  • राजकीय एँगलने या प्रकल्पाकडे बघू नये

  • आधीच वेदांताचा प्रकल्प आपल्या हातून गेला आहे

    त्यामुळे या प्रकल्पाची आणखी माहिती घेणार आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.