Ajit Pawar: 'काही लोकांना 'ध' चा 'मा' करायची सवयच...', 'त्या' वक्तव्यावर अजित पवारांचे स्पष्टीकरण

Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याची राज्यभर चर्चा सुरू आहे. यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावरून अजित पवारांवर टीका केली होती. या वक्तव्यावर अजित पवार यांनी पोस्ट करत स्पष्टीकरण दिलं आहे.
Ajit Pawar
Ajit PawarEsakal
Updated on

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपुर्वी भाषणादरम्यान केलेल्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. या वक्तव्यावरून शरद पवार गटातील नेत्यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला. अजित पवार हे शरद पवार यांच्या मृत्यची वाट पाहत आहेत का? असा खोचक सवाल शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. या वक्तव्याची राज्यभर चर्चा झाल्यावर अजित पवार यांनी ट्विट करत स्पष्टीकरण दिलं आहे.

सोशल मिडीया एक्स वरती अजित पवारांनी पोस्ट करत स्पष्टीकरण दिलं आहे. "काल माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. माझं पहिल्यापासून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असल्यापासून एवढंच म्हणणं होतं की, ज्येष्ठ नेत्यांनी शारीरिक दगदगीचा विचार करावा आणि प्रकृतीची काळजी घ्यावी. हे मत मी पूर्वी देखील मांडलेलं आहे. मात्र काही लोक स्वतःच्या राजकारणासाठी ज्येष्ठ नेत्यांचा वापर करू पाहतात. त्यांना ह्या गोष्टी कळणार नाहीत. माझ्या त्यांच्याबद्दलच्या भावना मी वेळोवेळी मांडलेल्या आहेत. पण काही लोकांना 'ध' चा 'मा' करायची सवयच असते, अशा नाटकीबाज लोकांना मी महत्त्व देत नाही. मात्र सर्वसामान्य लोकांना माझ्या भावना कळाव्यात, म्हणून मी हे म्हणणं मांडत आहे", असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Ajit Pawar
Hemant Dabhekar: हेमंत दाभेकरची भेट घडवून आणली म्हणून शिवसेनेच्या निरीक्षकाची हकालपट्टी; श्रीकांत शिंदेंसोबत नेमकं काय घडलं?

काय म्हणाले होते अजित पवार?

आगामी लोकसभा निवडणुक ही आमची शेवटची निवडणूक आहे, असं सांगून काही लोकं तुम्हाला भावनिक करतील. पण खरंच कधी शेवटची निवडणूक आहे हे मला माहित नाही. परंतु तुम्ही भावनिक होऊ नका. मी देईल त्या उमेदवाराला मतदान करा, असं अजित पवार म्हणाले होते. त्यानंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर निशाणा साधला होता. त्यानंतर आज अजित पवारांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत स्पष्टीकरण दिलं आहे.

Ajit Pawar
Cabinet Meeting : मुंबईकरांना यंदाही करवाढ नाही; मंत्रिमंडळ बैठकीत 'हे' महत्त्वाचे निर्णय

त्यांच्या स्पष्टीकरणानंतर पुन्हा एकदा शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांची पोस्ट शेअर करत, "नाटकी लोकांना किंमत देत नाही तर खुलासा कश्याला करता आहात. साहेबांच्या नावाचा फायदा तुम्हाला किती झाला हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा तुमच्या मनातले तोंडात आले आणि महाराष्ट्राला सत्य कळले जाऊ द्या कधी तरी खरा चेहरा बाहेर येतोच नाहीतर तुम्ही इतकी सारवासारव केली नसती आणि हो कावळ्याच्या शापानी गाय मरत नसते", हल्लाबोल केला आहे.

Ajit Pawar
MSPपेक्षा कमी किंमतीत कापूस खरेदी केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करा; फडणवीसांचे मंत्रिमंडळ बैठकीत निर्देश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.