Ajit Pawar: 'तर पवारांची अवलाद नाही...', २०१७साली भाजपसोबत युती का झाली नाही अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

भाजपसोबत युतीसाठी पाच बैठका त्याच बंगल्यात झाल्या असं अजित पवारांनी सांगितलं
Ajit Pawar
Ajit PawarEsakal
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या शपथविधीमुळे मोठी उलाढाल सुरू झाली आहे. तर पक्षातील आमदार, खासदार, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यामध्ये कोणत्या पवारांना पाठिंबा द्यायचा याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. एकीकडे अजित पवारांना पाठिंबा देणारे आमदार किती आणि शरद पवार यांना पाठिंबा देणारे आमदार कोण हे अद्याप स्पष्ट झालेलं नव्हतं. त्यासाठी आज राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी महत्वाची बैठक आयोजित केली आहे.(Latest Marathi News)

या बैठकीवेळी बोलताना राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील अनेक घडामोडींवर भाष्य केलं आहे. २०१७ मध्ये काही वेगळे करण्याचा प्रयत्न झाला, त्याबद्दल अजित पवार यांनी 2017 सालच्या त्या घटनेची आठवण करून दिली आहे. (Latest Maharashtra News)

Ajit Pawar
Sunil Tatkare: 'जय भीम अल्ला हाफिज..' कार्यकर्त्यांची खदखद व्यक्त करताना तटकरेंच्या भाषणाची अनोखी सांगता

'2017 साली प्रांताध्यक्ष सुनिल तटकरे, अजित पवार, जयंत पाटील बाकीचे नेते यांच्यासोबत वर्षा बंगल्यावर चर्चा झाली होती. भाजपकडुन सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, चंद्रकांत पाटील हे चौघेजण होते. कोणती खाती, कोणती पालकमंत्री पदं सगळं ठरलं होतं, मी महाराष्ट्राला खोटं बोलणार नाही. खोटं बोललो तर पवारांची अवलाद सांगणार नाही'.(Latest Marathi News)

'सगळं ठरलं, निरोप आला तटकरेंना दिल्लीला बोलावलं गेलं. त्यांच्या वरिष्ठांबरोबर आपल्या वरिष्ठासोबत मीटिंग झाली. 25 वर्ष आमचा मित्रपक्ष आम्ही सोडणार नाही, असं सांगितलं. तेव्हा आमचे वरिष्ठ म्हणाले शिवसेना आम्हाला चालत नाही. भाजप म्हणाले, आम्ही शिवसेनेला सोडणार नाही.'(Latest Maharashtra News)

Ajit Pawar
Ajit Pawar Latest News : अजित पवारांचीच दादागिरी, राष्ट्रवादीचे 'इतके' आमदार त्यांच्या पाठीशी

2019 ला निकाल लागले, परिस्थिती काय होती माहिती आहे. मोठे उद्योगपतीच्या घरी, आपले वरिष्ठ नेते, दुसरे वरिष्ठ नेते प्रफुल पटेल, उद्योगपती भाजपचे वरिष्ठ नेते, मी आणि देवेंद्र फडणवीस आमच्यात सगळी चर्चा झाली. पाच बैठका वर्षा बंगल्यात झाल्या. मला आणि देवेंद्रला सांगितलं कुठे बोलायचं नाही. नेत्यांनी सांगितलं म्हणून बोललो नाही.(Latest Maharashtra News)

Ajit Pawar
Sharad Pawar: अजित पवारांनी शरद पवारांसाठी स्टेजवर खुर्ची रिकामी ठेवली? फोटो व्हायरल..जाणून घ्या सत्य

मला कुणाला बदनाम होऊन द्यायचं नाही. हे सगळं सुरू असताना अचानक बदल झाला आणि सांगितलं शिवसेनेसोबत जायचं. २०१७ ला शिवसेना जातीयवादी आणि दोन वर्षांनी ते मित्रपक्ष झाला आणि भाजपसोबत जाणार होतो तो भाजप जातीयवादी झाला. असं चालत नाही असं अजित पवार बैठकी वेळी बोलताना म्हणाले आहेत.(Latest Marathi News)

2017 साली भाजपसोबत वाटाघाटी झाली. पण ती शिवसेना सोबत नको म्हणून तोडली, २०१७ ला शिवसेना जातीयवादी म्हणून सोबत गेले नाहीत. 2017 पर्यंत शिवसेना जातीयवादी मग 2019 ला मित्रपक्ष कसा झाला? असा रोखठोक प्रश्न अजित पवार यांनी यावेळी उपस्थित केला आहे.(Latest Maharashtra News)

Ajit Pawar
Chhagan Bhujbal: 'शरद पवारांनी मला भेटायला बोलवलं तर मी…', छगन भुजबळांच्या वक्तव्यामुळे खळबळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.