Ajit Pawar: अजित पवार भाजपसोबत जाण्याच्या चर्चा आणि शिंदे गटात खळबळ

MVA
MVAesakal
Updated on

राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंकर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. मात्र महाविकास आघाडीमध्ये आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मतभेद पाहिला मिळत आहेत.

MVA
Uddhav Thackeray: शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या भेटी मागील कारण आलं समोर; लवकरच...

अशातच शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी केलेल्या एका विधानामुळे एकच खळबळ उडाली होती. गोव्यात माध्यमांशी बोलत असताना अडसूळ म्हणाले होते, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर भाजपसोबत गेला तर आम्ही स्वत:च्या बळावर निवडणुका लढवू शकतो" त्यामुळे पुन्हा एकदा पहाटेचा शपथविधी राज्याला पाहिला मिळू शकतो.

त्यानंतर अंजली दामानिया यांचे ट्वीट चांगलंच चर्चेत आलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, "आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत, आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत,तेही लवकरच"

अंजली दामानिया आणि आनंदराव अडसूळ या दोघांच्या विधाना मागे सत्तांतराचा वास आहे का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पाडला आहे.

MVA
Ajit Pawar : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात नवा ट्विस्ट; आरोपपत्रातून अजित-सुनेत्रा पवारांचं नाव काढलं?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्याशी संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही भाजप नेत्यानी अमित शाह यांना राज्यातील राजकीय परिस्थितीची संपूर्ण माहिती दिल्याची माहीती समोर आली आहे.

दरम्यान काल उद्धव ठाकरे यांनी रात्री शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट राजकीय दृष्ट्या महत्वाची समजली जात आहे. या संपूर्ण घडामोडीसह राज्यातील आणि मुंबईतील राजकीय परिस्थितीचा आढावा चंद्रशेखर बावणकुळे आणि आशिष शेलार यांनी अमित शाह यांना दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.