NCP Ajit Pawar: "आमदारांच्या पत्नीला भेटून त्यांना इमोशनल केलं जातं"; अजितदादांचं काकांवर टीकास्त्र

Ajit Pawar criticize Sharad Pawar: अजितदादांच्या गटाच्या बैठकीत त्यांनी शरद पवारांवरही टीका केली आहे.
Ajit Pawar criticize Sharad Pawar
Ajit Pawar criticize Sharad Pawar
Updated on

मुंबई : राष्ट्रवादीतून फुटल्यानंतर अजितदादांचा गट सत्तेत सहभागी झाला. यानंतर त्यांची कार्यकर्त्यांची पहिली बैठक पार पडली. यावेळी त्यांनी शरद पवारांवर सडकून टीकाही केली. राष्ट्रवादीच्या आमदारांच्या पत्नीला भेटून त्यांना इमोशनल केलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. (Ajit Pawar criticism on his uncle Sharad Pawar in Meeting of Ajit dada group)

Ajit Pawar criticize Sharad Pawar
Prafull Patel: विरोधीपक्षांच्या बैठकीवर प्रफुल्ल पटेलांचा हल्लाबोल; म्हणाले, मला हसू येत होतं...

अजित पवार म्हणाले, "शेतकरी साठ वर्षांचा झाल्यानंतर तरुण मुलाला सांगतो की आता तू पंचवीस वर्षाचा झाला तू शेती बघायची मी तुला सल्ला देईल. उद्योगपतींची पण ती पद्धत आहे. पण आत्ताचा जो हट्ट आहे तो काय आहे? मी सुप्रियाशी बोललो की, आपण एकाच घरातले आहोत त्यांना सांग. ती म्हणाली ते हट्टी आहेत. पण हा कसला हट्ट आहे?"

Ajit Pawar criticize Sharad Pawar
NCP Ajit Pawar : अजित पवारांचा काकांवर हल्ला! ''मुख्यमंत्रीपद डावललं, शिंदेंनी शपथ घेण्याआधीच भाजपशी...''

"आमचा आदर आहे पण महाराष्ट्रातील जनतेला पण हे कळं पाहिजे की, काही आमदारांना बोलावून घेतलं जातं. ते भेटले नाहीतर तर त्यांच्या पत्नींला फोन केला जातो, त्यांना भावनिक बनवलं जातं. मी नाव घेत नाही पण वरिष्ठ नेत्यांनी एका आमदाराला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर तो म्हणाला मी दादांना शब्द दिला आहे, आता आम्ही दादांसोबत राहणार आहोत. हे सर्व आमदार म्हणायचे की दादा काहीतरी करा. २०१९ ला तुम्ही आता काही केलं तर आम्ही तुमच्या पाठीशी ताकदीनं उभं राहू असं त्यांनी सांगितलं", अशा शब्दांत अजितदादांनी पवारांवर सडकून टीका केला.

Ajit Pawar criticize Sharad Pawar
Prafull Patel: विरोधीपक्षांच्या बैठकीवर प्रफुल्ल पटेलांचा हल्लाबोल; म्हणाले, मला हसू येत होतं...

अजित पवार पुढे म्हणाले, "माझ्यात खोट नाही पण त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे की, कुणीही आमदारांनी फुटायचं नाही. एका आमदाराला तर वरिष्ठांनी समजावून सांगितलं की, पण तो म्हणाला नाही दादा मला आता आमदारकी नाही मिळाली तरी चालेल. शेवटी वरिष्ठांनी काय शब्द वापरला तू निवडूनच कसा येतो ते बघतो. अरे तुमची मुलं ना ती साथ दिली ही भाषा दैवतानं करायची, वरिष्ठांनी करायची. शेवटी तो आमदार म्हणाला मला नको आमदारकी मी घरी बसतो. साधे कार्यकर्ते आहेत साधे सहकारी आहेत"

Ajit Pawar criticize Sharad Pawar
Marathi News : राज्यात राजकीय गोंधळ, दिवसभरात घडलेल्या प्रत्येक बातमीचे अपडेट, एका क्लिकवर वाचा

आम्ही सुनील शेळकेला मावळात सोधलं, निलेश लंकेला पारनेरला शोधलं, डॉ. लहमटेला अकोल्यात शोधलं, अशा अनेक जणांची नाव घेता येतील. पण मित्रांनो मला एक सांगा आपण हे सगळं करतो ते राज्याच्या भल्या करता करतो आहे, अशा शब्दांत अजितदादांनी त्यांना भावनिक आवाहन केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.