Ajit Pawar: दसरा मेळाव्याच्या आधीच अजित पवारांचा दोन्ही गटाला 'मोलाचा सल्ला'

Ajit Pawar
Ajit Pawarsakal
Updated on

पुणे : आज दसऱ्याच्या निमित्ताने शिवसेनेच्या दोन्ही गटाचा मुंबईत मेळावा पार पडणार आहे. तर या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवारांनी दोन्ही गटाला इशारा दिला आहे. पुण्यातील काही दुकानांचे उद्घाटनासाठी ते आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

(NCP Leader Ajit Pawar On Shivsena Dasara Melava)

दरम्यान, आज शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांचा आणि बीकेसी मैदानावर एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा पार पडणार असून यासाठी राज्यभरातील शिवसैनिकांना हजेरी लावली आहे. त्यामुळे मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात आले असून दोन्ही मेळावे एकाच वेळी होणार असल्याची चर्चा आहे. तर यावेळी दोन गटात कटूता वाढू नये यासाठी काळजी घेण्याचे आवाहन अजित पवारांनी केलं आहे.

Ajit Pawar
Samana : "भाजप महाराष्ट्राच्या इतिहासातून नष्ट होईल, पुढच्या पिढीला कळणारसुद्धा नाही"

"शिंदे आणि ठाकरे यांनी जरूर आपली ताकद दाखवण्याचा, पक्ष वाढवण्याचा आणि भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. पण दोघांनीही सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे. पण लोकशाहीची परंपरा जपत कुणाही बद्दल वक्तव्य करू नये, महाराष्ट्राच्या परंपरेला डाग लागणार नाही, कमीपण येणार नाही आणि दोघांमध्ये कोणत्याही प्रकारची कटूता निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी" असा निर्वाणीचा सल्ला अजित पवारांनी केला आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत आज युक्तीवाद केला जाणार असून केंद्रीय निवडणूक आयोग याबाबत निर्णय देणार आहे. तर अंधेरी पूर्व येथील पोटनिवडणुकीच्या आधी हा निर्णय लागणार असल्याची चर्चा आहे. तर हा निर्णय आला नाही तर या निवडणुकीत दोन्ही गटासमोरील पेच वाढणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.