Mantralaya Cabin : देवेंद्र फडणवीसांनी नाकारलेलं केबिन नं. ६०२ शापित केबिन अजित पवारांच्या गळ्यात बांधण्याचा डाव?

मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील ते दालन घेण्यास मंत्री तयार होईनात
Mantralayas Cabin No. 602
Mantralayas Cabin No. 602Esakal
Updated on

राष्ट्रवादीत मोठी फुट पडली आणि अजित पवार यांच्यासह शरद पवार यांच्या जवळच्या 8 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आठवडाभरापूर्वी अजित पवार यांनी राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. तेव्हापासून अजित पवार राज्यातील राजकारणात चर्चेचा विषय ठरले आहेत. (Latest Marathi News)

अशातच आता महाराष्ट्राचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रालयात ६०२ क्रमांकाची केबिन देण्यात आल्याची चर्चा होती. गेल्यावेळी २०१९ मध्ये अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. तेव्हा हे सरकार औटघटकेचं ठरले होते.आताही अजित पवारांना हीच केबिन मिळाली होती पण त्यांनी ती नाकारली असल्याची माहिती समोर आली आहे.(Latest Marathi News)

मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर असलेली आणि आता पुन्हा एकदा चर्चेत आलेली ६०२ नंबरची केबिन अशुभ मानली जाते. या केबिनमध्ये आतापर्यंत काम करणाऱ्या कोणत्याही मंत्र्याला बढती मिळाली नाही, उलट त्याला राजकीय जीवनामध्ये वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले असल्याची अजित पवारांची समजूत आहे. याच भावनेतून अजित पवार यांनी ही केबिन नाकारल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.(Latest Marathi News)

Mantralayas Cabin No. 602
Maharashtra Politics: रात्रीस बैठका चाले! वर्षा बंगल्यावर मध्यरात्रीपर्यंत तीन नेत्यांमध्ये खलबतं; CM शिंदे आज करणार मोठी घोषणा?

अजित पवार यांनी ६०२ नंबरची सोडून सहाव्या मजल्यावरील ७१६, ७१७, ७२२ किंवा ७२३ यापैकी कोणत्याही केबिनमध्ये बसण्याची तयारी दाखवली आहे. त्यानुसार सध्या मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर अजित पवार यांची केबिन तयार करण्याचे काम वेगात सुरू आहे.(Latest Marathi News)

मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील ही ६०२ नंबरची केबिन अनेकदा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. ही केबिन अशुभ असल्यामुळे संबंधित नेत्यांना लाभत नसल्याची चर्चा आहे. यापूर्वी ६०२ नंबरची केबिन एकनाथ खडसे, पांडुरंग फुंडकर आणि अजित पवार यांना मिळाली होती.(Latest Marathi News)

Mantralayas Cabin No. 602
Weather Update: उत्तर भारतात पावसाने हाहाकार! तर महाराष्ट्रात येत्या 4-5 दिवसात संमिश्र पाऊस

तर एकनाथ खडसे यांची राजकीय कारकीर्द खडतर ठरली. तर अजित पवारांनाही राजकीय जीवनात आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनीही ही केबिन नाकारल्याचे सांगितले जाते.(Latest Marathi News)

Mantralayas Cabin No. 602
Shivsena MLA: राज्यपालांनी हिरवा कंदील दाखवलेल्या 12 आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा होणार? आज न्यायालयात सुनावणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.