Nilesh Lanke : निलेश लंकेंचं काही ठरेना? दोन दिवसात निर्णय होण्याचे केले सूतोवाच

Rashtravadi Congress : राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्रित राहावं निलेश लंके यांचं आवाहन
Nilesh Lanke
Nilesh LankeEsakal
Updated on

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रविवारी मोठा राजकीय भूकंप घडला आहे. पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनी आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी झाली असून जवळपास ४६ आमदारांसह अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे ९ आमदार मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. (Latest Marathi News)

त्यानंतर अजित पवार यांच्यासह 9 आमदारांवर कारवाई करत त्यांना अपात्र करावं म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने मोठं पाऊल उचललं आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी रात्री एक वाजता थेट विधानसभा अध्यक्षांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे अपात्रतेची याचिका दिली आहे. या नऊ आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष आता काय निर्णय देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.(Latest Marathi News)

अशातच अजित पवार यांना पाठिंबा देणारे आमदार निलेश लंके यांनी आपण सर्वजण एकत्र असल्याची भूमिका व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे माझे कुटुंब असून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब,मा.अजितदादा पवार व मा.सुप्रियाताई सुळे हे आमचे नेते व कुटुंब प्रमुख आहेत असं निलेश लंके यांनी म्हंटलं आहे.(Latest Marathi News)

Nilesh Lanke
Ajit Pawar: भाजप करणार शिंदेगटाची कोंडी? CM शिंदेंच्या गटाला अजितदादांची साथ फायद्याची की तोट्याची

निलेश लंके यांनी यासंबधी ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एकीकडे त्यांनी अजित पवारांना पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे आपण सर्वजण एक कुटुंब आहे असंही ते म्हणत आहेत.(Latest Marathi News)

काय लिहलं आहे निलेश लंके यांनी ट्विटमध्ये?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे माझे कुटुंब असून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब,मा.अजितदादा पवार व मा.सुप्रियाताई सुळे हे आमचे नेते व कुटुंब प्रमुख आहेत. ह्या कुटुंबातील मी एक अतिशय छोटा घटक आहे.सद्याच्या बदलेल्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेते मंडळींनी एकत्र राहावे अशी माझी भूमिका आहे. तरी येणाऱ्या दोन दिवसात सर्वाना अपेक्षित असा निर्णय होईल अशी मी अपेक्षा बाळगतो!

आपलाच

निलेश ज्ञानदेव लंके

आमदार पारनेर-नगर विधानसभा मतदार संघ

निलेश लंके यांच्या या ट्विटमुळे ते नेमकं कोणाला पाठिंबा देत आहेत, की त्यांचं आणखी काही ठरलं नाही अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

Nilesh Lanke
Ajit Pawar: 'राज्यभरात बॅनर लावताना शरद पवारांचा फोटो...', उपमुख्यमंत्री अजित पवारांचा कार्यकर्त्यांना आदेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.