नागपूर ते बारामती: महाराष्ट्राच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा बड्डे एकाच दिवशी, कशी आहे दोघांची स्टाईल ?

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस ही दोन्ही महाराष्ट्राच्या राजकारणतली दिग्गज नावं आहेत. विरोधी पक्षात असूनही यांच्यात काही साम्य मात्र नक्की आहेत
Ajit Pawar Devendra Fadnavis
Ajit Pawar Devendra FadnavisSakal
Updated on

राज्याचे सध्याचे सर्वात फेमस दोन राजकारण्यांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो. होय उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचाही आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याचा स्वभाव, काम करण्याची शैली आणि राजकीय कारकीर्दीतल्या काही साम्यांबद्दल...

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस ही दोन्ही महाराष्ट्राच्या राजकारणतली दिग्गज नावं आहेत. गेली अनेक वर्षे विरोधी विचारसरणीचे राजकारण करत असूनही यांच्यात काही साम्य मात्र नक्की आहेत आणि यातलं महत्त्वाचं आणि चर्चेतलं साम्य म्हणजे पहाटेचा शपथविधी. २०१९ साली संपूर्ण महाराष्ट्र झोपेत असताना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी राज्यपालांच्या साक्षीनं हातमिळवणी केली आणि सरकार स्थापन केलं. मात्र अजितदादांचं हे छोटंसं बंड फार काळ टिकू शकलं नाही आणि ८२ तासांतच हे सरकार कोसळलं. सर्वात कमी कालावधीसाठी मुख्यमंत्रिपदी राहिल्याचा रेकॉर्ड देवेंद्र फडणवीसांच्या नावावर नोंदवला गेला.

मात्र पुढच्या अडीच तीन वर्षात राजकीय पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आणि अजित पवार फडणविसांच्या आग्रहाखातर परत बंडकर्ते झाले. सध्याच्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये हे दोन्ही नेते उपमुख्यमंत्री आहेत.

Ajit Pawar Devendra Fadnavis
भ्रष्टाचाराचा डाग नसलेला विकासाचा महामेरू देवेंद्र फडणवीस : राम सातपुते

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस दोघांचीही राजकीय पार्श्वभूमी पूर्णपणे वेगळी आहे. अजित पवार ग्रामीण भागातले, शरद पवारांच्या मुशीत घडलेले तर देवेंद्र फडणवीस शहरी भागातले आणि संघाच्या मुशीत घडलेले. याची छाप या दोघांच्या भाषणाच्या शैलीवरही पडलेली दिसते. अजित पवारांचा लहेजा काहीसा ग्रामीण आहे. रांगडे शब्द, रांगडी भाषा, गावातल्या पारावरच्या नागरिकाचंही लक्ष वेधून घेणारा. तर देवेंद्र फडणवीसांची भाषा शैली, संयत आणि संयमित. प्रत्येक शब्द तोलून मापून बोलणं. त्याच्या शैलीचा चाहता असलेला वर्गही शहरी भागातला.

Ajit Pawar Devendra Fadnavis
अजित पवार यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेसची शहरात शक्तिप्रदर्शनाची तयारी

दोघांच्या कामाच्या शैलीत मात्र काहीसं साम्य दिसून येतं. अजित पवारांच्या वक्तशीरपणाची चर्चा राज्याला काही नवी नाही. पहाटेच्या शपथविधीच नव्हे तर विकासकामंही पहाटे करणं, अगदी घडाळ्याच्या ठोक्यावर काम करण्याच्या त्यांच्या सवयीमुळे भल्या भल्या अधिकाऱ्यांची झोप उडाली होती. तर देवेंद्र फडणवीस चलाख, प्रशासनावर घट्ट पकड असणारे आणि प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करुन मगच त्यावर भाष्य करणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या राजकीय डावपेचांची उदाहरणं आपण विधानपरिषद, लोकसभा निवडणुकांमध्ये पाहिलीच आणि गेल्या जवळपास महिन्याभरापासून ते ठळकपणे दिसून येतच आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा येईन या वाक्याची अनेक विरोधकांनी खिल्ली उडवली. पण फडणवीस शब्दाचे पक्के होते. महाविकास आघाडीचं सरकार पाडून त्यातल्या दोन मोठ्या सेनापतीना फोडण्याची देवेंद्र फडणवीस यांची चाणक्य नीती संपूर्ण देशभरात गाजली.

अजित पवार सुद्धा आपल्या शब्दाला पक्के आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी पुरंदर मतदारसंघात सांगून विजय शिवतारे यांना पाडलं. अजित पवार जे बोलतात ते करून दाखवतात आणि याच कारणाने त्यांचे विरोधक त्यांना टरकून असतात हे खरे. याबाबतीत फडणवीस आणि अजित पवार या दोघांमध्ये देखील प्रचंड साम्य आहे.

अजित पवार, देवेंद्र फडणवीस दोघांची कार्यशैली, भाषाशैली, सगळंजरी वेगवेगळं असलं तरी यांच्याबाबतीत सारखी असलेली गोष्ट म्हणजे या दोन्ही अभ्यासू नेत्यांनी महाराष्ट्रातल्या राजकारणात महत्त्वाचं स्थान मिळवलंय. या दोन्ही नेत्यांची राज्याच्या राजकारणातली ओळख पुसता न येण्यासारखी आहे. दोघांचाही चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.