मुंबई : भाजपा नेते किरीट सोमय्या (BJP leader kirit somaiya) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), ठाकरे सरकारवर निशाणा साधल्यानंतर जरंडेश्वर कारखान्यावरुन अजित पवारांना (Ajit pawar) किरीट सोमय्यांनी 'चॅलेंज' केले होते. त्यांच्या आरोपामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं होतं. सुत्रांच्या माहितीनुसार अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे समजते. कारण त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरी आयकर विभागाचा छापेमारी झाल्याची बातमी समोर येतेय. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्या बारामती दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी ही छापेमारी सुरु झाल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
अजित पवार यांच्या अडचणीत वाढ? निकटवर्तीयांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी
भाजपा नेते किरीट सोमय्या (BJP leader kirit somaiya) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), ठाकरे सरकारवर निशाणा साधल्यानंतर जरंडेश्वर कारखान्यावरुन अजित पवारांना (Ajit pawar) किरीट सोमय्यांनी 'चॅलेंज' केले होते. अजित पवार यांच्या अडचणीत वाढ झाली असून इन्कम टॅक्स विभागाची कारवाई संचालकांच्या घरी सुरू असल्याचे समजते. दौंड शुगर, आंबलीक शुगर, जरंडेश्वर साखर, पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर कारवाई सुरू असल्याचे समजते. हे सर्व साखर कारखाने अजित पवार यांचे निकटवर्तीयांचे असून राज्य सरकारच्या पोलिस यंत्रणेला कुठलीही कल्पना न देता सीआरपीएफच्या जवानांची मदत घेऊन सुरू आहे. ही कारवाई केंद्रीय यंत्रणांनी सकाळी सात वाजल्यापासून सुरू आहे.
या कारवाईमुळे मोठी खळबळ
औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीसह तालुक्यातील काटेवाडी येथे आज सकळ पासून केंद्रीय तपास यंत्रणेकडून छापेमारी सुरु आहे. आयकर विभागाकडून ही छापेमारी सुरु असल्याचे बोलले जात आहे. सकाळपासूनच सुरु झालेल्या या कारवाई मुळे मोठी खळबळ उडाली आहे. नगर जिल्ह्यातील एका खासगी कारखान्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या निकटवर्तीयाची या पथकाकडून चौकशी केली जात आहे. काटेवाडीत हा निकटवर्तीय राहतो. दुसरीकडे बारामती एमआयडीसीतील एका आंतरराष्ट्रीय कंपनीत एक पथक पोहोचले आहे. त्यांच्याकडून कंपनीत तपासणी केली जात आहे.
केंद्रीय यंत्रणाच्या रडारावर बारामती, दोन ठिकाणी छापेमारी
बारामती शहरातील एमआयडीसीतील एक बडी कंपनी तसेच तालुक्यातील काटेवाडी येथील एका व्यक्तीच्या घराची केंद्रीय यंत्रणांकडून तपासणी सुरु झाल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान आयकर विभागाच्या अधिका-यांनी ही चौकशी सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, मात्र अद्याप याला दुजोरा मिळालेला नाही. बारामतीत दोन ठिकाणी केंद्रीय यंत्रणांच्या पथकांनी आज, गुरुवारी सकाळीच शोधमोहिम सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित अधिका-यांची भेटही होऊ न शकल्याने नेमकी ही शोधमोहिम कशासाठी सुरु आहे हेही निष्पन्न झालेले नाही. एका खासगी साखर कारखान्याशी संबंधित एका पदाधिका-याच्या घराबाहेरही हे अधिकारी ठाण मांडून असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले असले तरी या बाबत नेमका खुलासा झालेला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.