Ajit Pawar Education : अनेकांची शाळा घेणारे अजित पवार फक्त 10वी पास ! या कारणाने सोडावे लागले होते शिक्षण..

अजितदादा पवार यांनी अनेकांना शाळा शिकवल्याचे किस्से आपण बऱ्याचदा ऐकले असतीलच.
Taufiq Shaikh decide after meeting NCP Sharad Pawar or Ajit Pawar mahesh kothe solapur politics
Taufiq Shaikh decide after meeting NCP Sharad Pawar or Ajit Pawar mahesh kothe solapur politicsSakal
Updated on

Ajit Pawar Education : पुन्हा एकदा वर्षभराने मोठा राजकीय भूकंप होत असल्याचे बघायला मिळत आहे. मागच्या वर्षी महाविकास आघाडी सरकार पडून शिवसेना आणि भाजपचे युती सरकार स्थापन झाले होते. तसाच प्रकार पुन्हा एकदा घडताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून आता पुन्हा अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदासाठी शपथ घेतली आहे.

महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्याआधीही एकदा अजित पवार यांनी पहाटे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्यांमध्ये सर्वाधिक वेळा म्हणजे ४ वेळा शपथ घेणारे अजित पवार आहेत. त्यांचे शिक्षण किती जाणून घेऊया.

Ajit Pawar Education
Ajit Pawar Educationesakal

अजित पावार हे राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे असून त्यांनी राजकारणाचे धडे राष्ट्रवादी पक्षातच गिरवले आहेत. त्यांचे युती सरकारमध्ये सहभागी होणे ही एक नाट्यमय घटना घडली.

myneta वरील प्रतिज्ञापत्रानुसार अजित पवार हे १० वी पास राजकारण्यांपैकी एक आहेत. ते स्पष्ट वक्ते नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी आजवर अनेकांची शाळा घेतली आहे. अनेकांना धडे शिकवले आहेत.

Taufiq Shaikh decide after meeting NCP Sharad Pawar or Ajit Pawar mahesh kothe solapur politics
Ajit Pawar: राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली! पक्षातील खासदार, आमदार पवारांच्या बंगल्यावर दाखल

अजित पवार यांचे पूर्ण नाव अजित अनंतराव पवार हे आहे. तळागाळात पोहचलेले ते नेते आहेत. त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे २२ जुलै १९५९ रोजी झाला होता. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे आहेत व पक्षातले एक महत्वाचे नेते आहेत.

Taufiq Shaikh decide after meeting NCP Sharad Pawar or Ajit Pawar mahesh kothe solapur politics
Ajit Pawar : अजित पवारांनी प्रदेशाध्यक्ष व्हावं! राष्ट्रवादीच्या आमदारांची आग्रही भूमिका; पक्षात हालचालींना वेग

शिक्षण

अजित पवार यांचे दहावीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा या त्यांच्या आजोळच्या गावी झाले. त्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी मुंबईत जावे लागले. पण वडिलांचे अकसिमिक निधन झाल्याने शिक्षण मध्येच सोडावे लागले.

Taufiq Shaikh decide after meeting NCP Sharad Pawar or Ajit Pawar mahesh kothe solapur politics
Ajit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट! सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

राजकारणात प्रवेश

वडिलांचे अकस्मिक निधन झाल्याने शिक्षण सोडून परत यावे लागले. बारामतीत आल्यावर त्यांनी सहकारी संस्थांमधून सामाजिक व राजकीय कार्याला सुरुवात केली. ते सहकारी साखर कारखान्याच्या मंडळावर निवडुन आले. त्यानंतरच त्यांचा सक्रिय राजकारणात प्रवेश झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.