मुंबई : मंत्रालयातील फाईलींबाबत सध्या नवी राजकीय चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळं सरकार नेमकं कोण चालवतंय? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याचं कारण म्हणजे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून आलेली कोणतीही फाईल ही मुख्यमंत्र्यांच्या टेबलवर जाण्याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपासल्यानंतरच पुढे जाईल, असे निर्देश मुख्य सचिवांनी अधिकाऱ्यांना दिल्याचं सांगितलं जात आहे. साम टीव्हीनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Ajit Pawar files will go to CM Eknath Shinde via Devendra Fadnavis Chief Secretary orders)
सामच्या वृत्तानुसार, "अजित पवार हे मुख्यमंत्र्यांच्या कामात हस्तक्षेप करतात अशा बातम्या काही दिवसांपूर्वी येत होत्या. पण या हस्तक्षेपावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चाप बसवला आहे. कारण अजित पवारांकडून येणाऱ्या फाईल्स या व्हाया देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांकडे जातील, त्यानंतर त्यावर अंतिम निर्णय एकनाथ शिंदे घेणार आहेत. याबाबत मुख्य सचिवांच्या आदेशांनी शासन निर्णय झाला आहे"
सामान्यतः अर्थमंत्रालयाच्या फाईल्स या थेट मुख्यमंत्र्यांकडेच जात असतात. पण आता यामध्ये बदल करुन अजित पवारांच्या आक्रमक भूमिकेवर नियंत्रण आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चाही सुरु झाली आहे.
यावर भाष्य करताना विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "कारण भाजपच्या आणि शिंदे गटाची अर्धी अर्धी पद राष्ट्रवादीनं घेतलीच आहेत. त्यामुळं गिरीश महाजन यांचीच नव्हे तर गावपातळीवरील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे"
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.