"अजितदादांना मानलंच पाहिजे, राष्ट्रवादीच्या खात्यांना सर्वाधिक निधी"

राज्याच्या अर्थसंकल्पावरुन देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना टार्गेट केलं.
Devendra Fadnvis_Ajit Pawar
Devendra Fadnvis_Ajit Paware sakal
Updated on

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी सडेतोड भाष्य केलं. अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना थेट टार्गेट केल. तसंच अजित दादांनी सर्वच्या सर्व निधी राष्ट्रवादीकडील खात्यांना दिला, असा आरोपही यावेळी फडणवीस यांनी केला. (Ajit Pawar gave all funds to NCP accounts Criticism of Fadnavis)

Devendra Fadnvis_Ajit Pawar
अनिल देशमुख तुरुंगातच; न्यायालयाने पुन्हा फेटाळला जामीन

फडणवीस म्हणाले, या सरकारमध्ये ज्याची ताकद आहे त्याला मदत मिळते. राज्याचा अर्थसंकल्प ५,४८,५७७ कोटींचा आहे. यांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यांना ३ लाख १४ हजार ८२० कोटी रुपये मिळाले म्हणजेच एकूण बजेटपैकी ५७ टक्के निधी मिळाला. तर काँग्रेसला १ लाख ४४ हजार १९३ कोटी म्हणजे २६ टक्के निधी तर शिवसेनेकडील खात्यांना ९० हजार १८१ कोटी म्हणजे १६ टक्के निधी देण्यात आला आहे. तसेच मुंबई शहराच्या निधीत १३० टक्के वाढ झाली आहे. त्यामुळं अजित दादांना मानलंच पाहिजे कारण त्यांनी डंकेच्या चोटवर काम केलंय. मागच्यावेळीही त्यांनी हेच केलं होतं"

Devendra Fadnvis_Ajit Pawar
खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे अशी अर्थसंकल्पाची अवस्था - देवेंद्र फडणवीस

दरम्यान, राज्याचा जीडीपी वाढत असल्याचा दावाही यावेळी फडणवीसांनी खोडून काढला. ते म्हणाले, जीडीपी वाढला असेल तर ६ हजार कोटींची महसुली तूट झाली नसती. जीडीपीमध्ये ३.५ टक्के वाढत दिसत आहे पण कागदोपत्री ही वाढ १२ टक्के दाखवण्यात आली आहे, असा आरोपही यावेळी फडणवीस यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()