Ajit Pawar: पवारांच्या सभांमुळं अजित पवार गटात अस्वस्थता?; मंत्र्यांवर सोपवल्या जिल्हावार जबाबदाऱ्या

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवारांनी अजित पवारांच्या गटाला शह देण्यासाठी सभांचा धडाका लावला आहे.
Sharad Pawar and Ajit Pawar Group
Sharad Pawar and Ajit Pawar Group
Updated on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवारांनी अजित पवारांच्या गटाला शह देण्यासाठी सभांचा धडाका लावला आहे. यापार्श्वभूमीवर अजित पवारांच्या गटामध्ये अस्वस्थता असल्याचं चित्र आहे. यापार्श्वभूमीवर पक्षसंघटना वाढीकरीता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं मंत्र्यांवर जिल्हावार जबाबदारी सोपवली आहे. (Ajit Pawar group assigned Districtwise responsibilities to Ministers)

Sharad Pawar and Ajit Pawar Group
Bhagvat Karad: छत्रपती संभाजीनगरमधून भागवत कराड लोकसभा लढवणार? केला मोठा दावा

मंत्र्यांवरील या नव्या जबाबदाऱ्यांची माहिती देणारं पत्रक अजित पवार गटानं प्रसिद्ध केलं आहे. त्यानुसार, त्यांचे ९ मंत्री आणि खासदार प्रफुल पटेल यांच्यावर राज्यातील ३६ जिल्ह्यांत पक्ष संघटना वाढीकरीता जबाबदारी सोपवण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून खासदार सुनिल तटकरे यांच्या सहीनं हे पत्र प्रसिद्ध करण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

Sharad Pawar and Ajit Pawar Group
Rajya Sabha Billionaires MP: राज्यसभेत १२ टक्के खासदार अब्जाधीश; 'या' राज्यातील खासदारांचं प्रमाण सर्वाधिक

कुणावर कुठल्या जिल्ह्याची जबाबदारी?

  1. अजित पवार - पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या चार जिल्ह्यांची जबाबदारी

  2. प्रफुल पटेल - भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांची जाबाबदारी

  3. छगन भुजबळ - नाशिक, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर

  4. दिलीप वळसे पाटील - अकोला, वाशीम, छत्रपती संभाजीनगर व बुलढाणा

  5. हसन मुश्रीफ - कोल्हापूर, सिंधुदूर्ग आणि अहमदनगर

  6. धनंजय मुंडे - बीड, परभणी, नांदेड, जालना

  7. संजय बनसोडे - हिंगोली, लातूर व उस्मानाबाद

  8. अदिती तटकरे - रायगड, रत्नागिरी, ठाणे व पालघर

  9. अनिल पाटील - जळगाव, धुळे व नंदुरबार

  10. धर्मारावबाबा आत्राम - गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ

NCP
NCP

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.