Sunil Tatkare: "पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना..."; सुनील तटकरे यांचा मोठा खुलासा, संपूर्ण इतिहास मांडला

Sunil Tatkare
Sunil Tatkare
Updated on

Sunil Tatkare: अजित पवार गटाचं दोन दिवसीय वैचारीक मंथन शिबीर कर्जत येथे होत आहे. शिबीरात बोलताना खासदार सुनील तटकरे यांनी मोठा खुलासा केला आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री बदलण्याची चर्चा झाली होती. काँग्रेसचे दुसरे नेते मुख्यमंत्री होणार होते , राष्ट्रवादीने त्याला संमती दिली होती. शपथविधीचा दिवस ही ठरला होता. परंतु परदेशात असलेले काँग्रेसचे नेते परत आल्यावर त्या निर्णयात बदल झाला. कदाचित तो बदल होऊन जर निर्णय झाला असता तर राज्यात सत्ता आली असती, असे सुनील तटकरे म्हणाले.

सुनील तटकरे म्हणाले, २००४ साली युपीए सरकारं होत. त्याआधी १९९९ साली डीएमके सरकारमध्ये सहभागी झालं होतं. त्यामुळं आम्हीच म्हणजेच अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झालो म्हणजेच वेगळं काही केलं असं नाही. वेगळी भूमिका घ्यावी लागते. १९६२, ६७, ७२ साली काँग्रेस सरकार होतं. त्यानंतर आणीबाणी आली त्यानंतर काँग्रेसमध्ये फूट पडली. काँग्रेसच बहुमत असताना देखील काँग्रेसमध्ये विभाजन झालं.

१९७८ साली निवडणूका झाल्या यशवंतराव चव्हाण, सुधाकर नाईक सरकारमध्ये सहभागी झाले होते. १९८० साली इंदिरा गांधी आल्या. १९९५ पर्यंत एकहाती सत्ता आली. त्यानंतर भाजप शिवसेना सरकारं स्थापन झालं. आपण देखील सरकार स्थापन करु शकलो असतो. ४५ अपक्ष आमदार निवडून आले होते. पण काँग्रेस पक्षाने अत्यंत जहिरी टीका शरद पवार यांच्यावर टीका केली होती, असे सुनील तटकरे म्हणाले.  

निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. सत्तेसाठी आपण सहभागी झालो अशी टीका होते आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विस्तारासाठी काहीच काम केलं नाही, असे आयोगात सांगण्यात आले. याचे खूप दुख वाटते.

२००४ साली मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झाला असता. परंतु तसं होऊ दिलं नाही. ते का नाही होऊ दिलं नाही याचं स्पष्टीकरण अजित दादा तुम्ही आता द्यायला हवं, असे देखील तटकरे म्हणाले.

Sunil Tatkare
5 राज्यांच्या निवडणुकीतील 1,452 उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी; 2,371 करोडपती, 22 जणांवर खुनाचे तर 82 जणांवर...

अशोक चव्हाण, विलासराव यांनी आघाडी सरकार चांगलं चालवलं. परंतु पृथविराज चव्हाण २०१० साली मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने बदल झाला. अजित पवार यांच्यावर २००९ नंतर टीका सूरू झाली. त्यावेळी पक्षाने तुमची बाजू घ्यायला हवी होती. परंतू पक्षाने ती घेतली नाही, याच मला वाईट वाटल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.

तटकरे म्हणाले, अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी अनेकवेळा निरोप दिले. ती भेट झाली असती तर किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भुमिका घेतली असती तर तुमचा राजीनामा घ्यावा लागला नसता. ती भेट का होऊ देली नाही, काय माहित?. नंतर राजीनामा मंजूर झाल्याचं कोलकाता येथे जाहीर झालं.

भुजबळ माझ्यावर, दादांवर ७० हजार कोटी रुपयांचे आरोप झाले. १९५२ ते २०१२ पर्यंत जो खर्च झाला तो ७० हजार कोटी रुपये होता मग आमच्यावर ७० हजार कोटी रुपयांचा आरोप केला कसा?, असा प्रश्न देखील सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.

अजित पवार यांनी राष्ट्रवादीत काम केले नाही, असं म्हणतात. अजित पवार यांनी पक्ष स्थापन केल्यापासून फक्त फक्त पदे भोगली असं म्हणतात. दादा आणि संघटनेचा संबंध नाही अस म्हणतात. आता तूम्ही सांगा तुम्हांला हे पटत आहे का?, अजित पवार यांनी जे काम केलं. ते फक्त पक्षासाठी केलं, असे सुनील तटकरे म्हणाले.

वेगवेगळया कार्यक्रमात सांगितलं जात २०१९ सालची निवडणुक युतीला बहुमत देणारी होती. कौल अर्धा भाजप आणि अर्धा शिवसेनेच्या विरोधात जनतेने दिला होता. सोनिया गांधी यांनी उध्दव ठाकरे यांच्या सरकाराला पाठींबा दिला हे अघटित होतं. पहाटे शपथविधी झाला तो का झाला हे अजित पवार यांनी सांगितलं आहे.

कोणीतरी दावा करत की मी अलिबागला एक बैठक घेतली होती. मी त्यांना सांगतो अलिबागमध्ये जी बैठक झाली ती शरद पवार यांनी मला घ्यायला लावली होती. २०१७ साली राष्ट्रवादी आणि भाजप सरकार स्थापन झालं असतं. त्यावेळी याच हॉटेलमध्ये बैठक झाली होती. आज देखील त्याच हॉटेलमध्ये बैठक पार पडत आहे. काय योगा योग असतात त्यावेळी मी अध्यक्ष होतो आजही अध्यक्ष आहे, असा गौप्यस्फोट देखील सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले. 

Sunil Tatkare
Assembly Winter Session : 'फक्त टाईमपास करून वेळ मारून न्यायची...'; हिवाळी अधिवेशनाच्या कालवधीवरून विरोधकांची नाराजी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.