Ajit Pawar Portfolio : शिंदे गटाकडील 3 अन् भाजपकडे असलेले 'हे' 6 खाते अजित पवार गटाला मिळाले

ajit pawar ncp
ajit pawar ncpesakal
Updated on

मुंबईः अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंड केल्यानंतर २ जुलै रोजी ९ आमदारांचा शपथविधी झाला होता. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपासंदर्भात अनेक बैठका झाल्या शेवटी आज खातेवाटप झालेले आहे.

या खातेवाटपामध्ये अर्थ खातं अजित पवार यांच्याकडे देण्यात आलेलं आहे तर धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी खातं, दिलीप वळसे पाटील- सहकार, हसन मुश्रीफ- वैद्यकीय शिक्षण, छगन भुजबळ- अन्न व नागरी पुरवठा, धर्मराव आत्राम- अन्न आणि औषध प्रशासन, अनिल भाईदास पाटील- मदत आणि पुनर्वसन, संजय बनसोडे यांच्याकडे क्रीडा तर अदिती तटकरे यांच्याकडे महिला आणि बालकल्याण या विभागांची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे.

ajit pawar ncp
Chandrayaan 3: चांद्रयानचा पहिला टप्पा अन् ग्रामीण पुणेचं तगडं कनेक्शन... जाणुन घ्या काय ते?

एकनाथ शिंदे गटाकडून अजित पवार गटाला तीन खाती गेली आहेत. यामध्ये पहिलं कृषी, दुसरं मदत आणि पुनर्वसन आणि तिसरं अन्न आणि औषध प्रशासन. या खात्यांचे मंत्री अनुक्रमे धनंजय मुंडे, अनिल पाटील आणि धर्मरावबाबा आत्राम हे असतील. तर भाजपकडून सहा खाती गेली आहे. यामध्ये अर्थ, सहकार, वैद्यकीय शिक्षण, अन्न व नागरी पुरवठा, क्रीडा, महिला आणि बालकल्याण या खात्यांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग असतील.

ajit pawar ncp
Ajit Pawar Portfolio: अजित पवारांना अर्थ अन् मुंडे कृषिमंत्री, भाजप-शिंदे गटाच्या या मंत्र्यांना बसला मोठा फटका! पहा खातेवाटपाची संपूर्ण यादी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते असतील.

इतर २६ मंत्र्यांकडे 'या' खात्यांची जबाबदारी

  • छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

  • दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील – सहकार

  • राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास

  • सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

  • हसन मियाँलाल मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य

  • चंद्रकांतदादा बच्चू पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

  • विजयकुमार कृष्णराव गावित- आदिवासी विकास

  • गिरीष दत्तात्रय महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन

  • गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता

  • दादाजी दगडू भुसे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)

  • संजय दुलिचंद राठोड- मृद व जलसंधारण

  • धनंजय पंडितराव मुंडे - कृषि

  • सुरेशभाऊ दगडू खाडे- कामगार

  • संदीपान आसाराम भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन

  • उदय रविंद्र सामंत- उद्योग

  • प्रा.तानाजी जयवंत सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

  • रवींद्र दत्तात्रय चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून),

  • अब्दुल सत्तार- अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन

  • दीपक वसंतराव केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा

  • धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन

  • अतुल मोरेश्वर सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण

  • शंभूराज शिवाजीराव देसाई- राज्य उत्पादन शुल्क

  • कु. अदिती सुनिल तटकरे – महिला व बालविकास

  • संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे

  • मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता

  • अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.