Ajit Pawar : ऑफिस मिळाले पण चावी सापडेना! अजित पवार गटाची A-5 बंगल्यावरून झाली गोची

अजित पवार यांच्या हस्ते या कार्यालयाचे आज उद्घाटन होणार आहे
ajit pawar new ncp office a-5 bunglow
ajit pawar new ncp office a-5 bunglowesakal
Updated on

मुंबई : राष्ट्रवादी पक्षातून फुटून अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवार यांनी त्यांच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या काल केल्या आहेत. त्यानंतर अजित पवार गटाचे कार्यालय म्हणून A-5 क्रमांकाचा बंगला ते वापरणार होते पण ऐनवेळी या बंगल्याच्या चाव्या कुणाकडे आहेत याची कल्पना कुणालाच नसल्याने नेत्यांची मोठी धावपळ सुरू झाली आहे.

ajit pawar new ncp office a-5 bunglow
Audio Clip Viral : जंगलात जातो म्हणाणाऱ्या वसंत तात्यांना थेट संभाजीराजे छत्रपतींचा फोन; म्हणाले...

दरम्यान, नेते शिवाजीराव गर्जे, अजित पवार गटाचे युवक काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांची शोधाशोध सुरू झाली असून ऐनवेळी बंगला ताब्यात न मिळाल्याने मोठी पंचाईत झाली आहे. या नव्या कार्यालयाचे अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार होते. तर आजपासून अजित पवार गट या बंगल्याचा पक्षाचे कार्यालय म्हणून वापर करणार होते.

अजित पवार गटाकडून आज पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून जितेंद्र आव्हाड यांना अपात्र करण्याचा आणि जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून पदमुक्त निर्णय घेण्यात आला आहे. तर शरद पवार गटाने पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना निलंबीत करण्यात आले आहे.

अजित पवार गटाने आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी, अजित पवार यांची विधीमंडळ नेते पदी आणि अनिल पाटील यांची प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर पक्षातील इतर पदांवरील नियुक्त्यांचे सर्व अधिकार हे तटकरे यांना देण्यात आले आहेत.

दरम्यान, शरद पवार गटाने नऊ आमदारांविरोधात शिस्तभंगाची कारवाई केली तर अजित पवार गटाने जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड विरोधात कारवाई करण्यासाठीचे पत्र विधासभा अध्यक्षांकडे पाठवले आहे. त्याचबरोबर आमच्याकडे आमदारांची संख्या किती याची चिंता करू नका, आमच्याकडे आमदारांची संख्या नसती तर कालचा शपथविधी झाला नसता असं प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.