Maharashtra Politics: अजित पवार गटाला तीनच जागा? शिंदे गटाच्या दाव्याने अजित पवार गटात अस्वस्थता

भाजपने २३ आणि शिवसेनेने लोकसभेच्या २२ जागांवर आपला दावा सांगितल्यानंतर अजित पवार गटाला केवळ तीनच जागा मिळणार असल्याचं चित्र
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsEsakal
Updated on

भाजपने २३ आणि शिवसेनेने (शिंदे गट) लोकसभेच्या २२ जागांवर आपला दावा सांगितल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाला केवळ तीनच जागा मिळणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. मात्र, पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी महायुतीच्या लोकसभा जागावाटपाचे अंतिम सूत्र निवडणूक जाहीर झाल्यानंतरच ठरविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजप यांनी एकत्रित महायुती म्हणून लोकसभा निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. शिवसेनेने (शिंदे गट) यासंदर्भात सोमवारी सर्व मंत्री आणि खासदार यांची बैठक घेऊन मागील लोकसभा निवडणुकीत लढविलेल्या सर्व २२ जागांवर दावा केला आहे. तशा सूचनाही सर्व मंत्री आणि खासदारांना दिल्या आहेत.

भाजपनेही मागील निवडणुकीत लढविलेल्या २३ जागांवर आपला हक्क सांगितला आहे. राज्यात लोकसभेच्या एकूण ४८ जागा असल्याने उरलेल्या ३ जागाच राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) मिळणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Maharashtra Politics
Dhangar Reservation : ..म्हणूनच शरद पवारांनी धनगर आरक्षणाला विरोध केला; पडळकरांनी सांगितलं कारण

शिवसेनेने २२ जागांवर दावा केल्याबाबत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांना विचारले असता, ते म्हणाले, ‘‘प्रत्येक पक्षाला आपल्या जागा मागण्याचा हक्क आहे. प्रत्येक पक्ष जास्त जागांसाठी प्रयत्न करतो. मात्र जागा वाटपाचे सूत्र निवडणूक जाहीर झाल्यानंतरच ठरविण्यात येईल. त्यामुळे आता कोणी काय दावा केला याला फार महत्त्व नाही.’’ ‘‘महाराष्ट्रात केवळ ४८ जागा आहेत. त्यामुळे हे लक्षात ठेवूनच जागा मागाव्यात. नाहीतर ९० जागा असल्याप्रमाणे जागांची मागणी केली जाईल,’’ अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.

Maharashtra Politics
Israel Hamas War : इस्रायलची ताकद वाढणार! जो बायडन यांच्यानंतर आता ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनकही जाणार इस्त्राइल दौऱ्यावर

शरद पवार गटाची तयारी सुरू

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. गुरुवार (ता. १८) व शुक्रवारी (ता. १९) याबाबत बैठका होणार आहेत. गुरुवारी कोल्हापूर, हातकणंगले, रावेर, बारामती, शिरूर, सातारा आणि माढा या मतदारसंघांचा आढावा घेण्यात येणार आहे, तर शुक्रवारी दिंडोरी, नगर, हिंगोली, वर्धा, अमरावती, बीड, भिवंडी, जालना या लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात येणार आहे.

Maharashtra Politics
Devendra Fadanvis: फडणवीसांच्या घरासमोरच भाजपा पदाधिकाऱ्याकडून पोलिस उपायुक्ताला धक्काबुक्की, राऊतांनी शेअर केला VIDEO

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.