Ncp Political Crisis: अजित पवार गटाला चिन्हावरून न्यायालयानं फटकारलं; जाहिराती सादर करण्याचा अजित पवार गटाला आदेश

Ncp Political Crisis: ‘घड्याळ’ चिन्ह वापराच्या मुद्द्यावरुन सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला कठोर शब्दांत खडसावले आहे.
Ncp Political Crisis
Ncp Political CrisisEsakal
Updated on

नवी दिल्ली: ‘घड्याळ’ चिन्ह वापराच्या मुद्द्यावरुन सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला कठोर शब्दांत खडसावले आहे. न्यायालयाने चिन्ह वापरासंदर्भात दिलेल्या आदेशांचे अजित पवार गटाकडून पालन होत नसल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने न्यायालयात याचिका दाखल केली होती.

‘घड्याळ’ हे निवडणूक चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याचे प्रत्येक जाहिरातींमध्ये नमूद करावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने १९ मार्च रोजीच्या सुनावणीवेळी स्पष्ट केले होते. मात्र अजित पवार गटाकडून या आदेशाचे पालन होत नसल्याचे शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी न्या. सूर्यकांत आणि न्या. के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर, ‘आमच्या आदेशाचा कोणी चुकीचा अर्थ काढू नये,’ असे सांगत न्यायालयाने अजित पवार गटाची खरडपट्टी काढली.

Ncp Political Crisis
MVA Seat Sharing: ‘मविआ’त तीन जागांचा तिढा कायम; कालची बैठक ठरली निष्फळ, कोण घेणार माघार?

अजित पवार गटाच्या बाजूने ॲड. मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद केला. ‘निवडणूक आयोगाच्या आदेशावर स्थगिती नाही, त्यामुळे आम्ही प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे लिहीत आहोत. फक्त आदेशातील शेवटची ओळ बदलण्यात यावी,’ असे रोहतगी म्हणाले. यावर, आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या वृत्तपत्रातील जाहिराती सादर करण्याचे आदेश खंडपीठाने दिले. गेल्या महिन्यात देण्यात आलेल्या आदेशाचे पालन निवडणुका पार पडेपर्यंत केले जावे, असेही न्यायालयाने सांगितले.

Ncp Political Crisis
Maratha Reservation: जयश्री पाटील यांच्या आरक्षण विरोधी याचिकेवर या दिवशी होणार महत्वाची सुनावणी, कोर्टाकडे सर्वांचे लक्ष

राष्ट्रवादी काँग्रेसमधील चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. शरद पवार यांच्या पक्षाकडून दाखल याचिकेवर ही सुनावणी होणार आहे.

Ncp Political Crisis
Navneet Rana: नवनीत राणांची उमेदवारी धोक्यात?, सुप्रीम कोर्ट जात वैधता प्रमाणपत्रावर देणार निकाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.