NCP Political Crisis: 'अजित पवारांसोबत गेलेल्या काही लोकांना पुन्हा यायचंय पण..', शरद पवार गटाच्या नेत्याचा गौप्यस्फोट

शरद पवार गटाच्या नेत्याच्या या वक्तव्याने राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
NCP Political Crisis
NCP Political CrisisEsakal
Updated on

‘‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडून उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांपैकी काही आमदार आमच्या संपर्कात आहेत, त्यांच्या संदर्भात योग्यवेळी निर्णय घेण्यात येईल,’’ असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केला.

‘काही लोकांनी पुन्हा परत येण्याची इच्छा व्यक्त केली असून, त्यांच्याबाबत पक्ष निर्णय घेईल,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

आगामी लोकसभा निवडणूक ‘इंडिया’ आघाडीच्या माध्यमातून लढविण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत सात मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. पान I वरून

लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेताना प्रत्येक मतदार संघाबाबत त्या त्या मतदार संघातील कार्यकर्ते स्थानिक नेते यांच्याकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. प्रत्येक मतदारसंघाबाबत स्थानिक नेत्यांचे काय मत आहे? याबाबत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी माहिती घेतली.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, माजी मंत्री एकनाथ खडसे, खासदार सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, अशोक पवार आदी यावेळी उपस्थित होते. बैठकीनंतर जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना ज्या आमदारांनी पुन्हा येण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्याबाबत पक्ष निर्णय घेईल, असे स्पष्ट केले.

NCP Political Crisis
देवगिरीसमोरील घटना अतिशयोक्ती करण्याचा प्रयत्न, असं काही घडलं नाही; नागपूर पोलीस आयुक्तांचे स्पष्टीकरण

अडथळा आणायचा नाही

‘‘आमदारांच्या परतीबाबत खोलात जाऊन आम्हाला अडचण निर्माण करायची नाही.  कारण त्यांची काही कामे असल्याने आम्हाला त्यात अडथळा आणायचा नाही,’’ असे पाटील यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आजच्या बैठकीत कोल्हापूर, हातकणंगले, रावेर, बारामती, शिरूर, सातारा, माढा या लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. आढावा घेण्यात आलेल्या मतदारसंघांपैकी बारामती, शिरूर आणि सातारा येथे राष्ट्रवादीचे खासदार आहेत.

NCP Political Crisis
Nashik Lalit Patil : ललित पाटील पुण्यातून नाशिकला गेला, महिलेकडून २५ लाख घेतले अन्...नेमकं काय घडलं?

माढ्याबाबत पवारांनीच निर्णय घ्यावा

माढा मतदारसंघातून शरद पवार यांनीच निवडणूक लढवावी, अशी अपेक्षा या मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. मात्र पवार यांचे स्वास्थ्य आणि अन्य बाबींचा विचार करता याबाबतचा अंतिम निर्णय त्यांनीच घ्यावा, असेही मत काही कार्यकर्त्यांनी मांडले.

साताऱ्यात काळजी घ्यावी लागणार

सातारा मतदारसंघात विरोधी गट कोणत्याही स्तराला जाऊ शकतो, त्यामुळे या मतदारसंघात दगा फटका होण्याची शक्यता असल्याचे मत स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. तसेच या मतदारसंघात जास्त काळजी घेण्याची सूचनाही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

NCP Political Crisis
Lalit Patil Drugs Case: मुंबई पोलिसांच्या कारवाईनंतर पुणे पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये! ललित पाटील प्रकरणी दोन महिलांना केली अटक

शिरूर बारामतीमधून कार्यकर्तेच जास्त

शिरूर व बारामती या मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्येही शरद पवार गटाचे वर्चस्व असल्याचे दाखवून देण्यासाठी आज आमंत्रित केलेल्यांमध्ये नेत्यांपेक्षा कार्यकर्तेच जास्त होते. या दोन्ही मतदारसंघातून मोठे नेते अजित पवार गटात गेले असल्याने आपल्या गटाचेही याठिकाणी वर्चस्व असून कार्यकर्ते शरद पवार यांच्या पाठीशी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

आपला पक्ष कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाही. जे आमदार अजित पवार यांच्यासोबत गेले ते तपास यंत्रणांच्या चौकशीच्या भीतीने गेले आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांनी काळजी किंवा भीती बाळगण्याचे कारण नाही. - शरद पवार,

NCP Political Crisis
अपात्र आमदारांचा निर्णय होईना; CM शिंदे व नार्वेकरांची ‘वर्षा’वर बंद दाराआड चर्चा, नेमकं काय घडतय?

जितक्या जागा द्यायच्या, तितक्या देऊ फडणवीस 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) , राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी आढावा बैठक घेतल्यानंतर सावध झालेल्या भारतीय जनता पक्षानेही आपल्या पक्षाचे संघटन वाढविण्यावर जोर देण्याचे ठरविले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने लोकसभेच्या जागांबाबत खुलासा करताना  लोकसभेच्या जागांच्या बाबत कोणीही काहीही मागितलेले नाही. ही  फक्त माध्यमांतील चर्चा आहे.

आम्ही चर्चेला बसून ज्या पक्षाला जितक्या जागा द्यायच्या आहेत तितक्या जागा देऊ, असे स्पष्ट केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने गेल्या लोकसभा निवडणुकीत लढविलेल्या २२ मतदारसंघांवर दावा सांगितला आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी खुलासा केला.

NCP Political Crisis
Mumbai Breaking : मुंबईतील कोळीवाड्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागणार ; कोळी बांधवांना मिळणार दिलासा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.