Mohan Bhagwat: ''महात्मा फुलेंनीच शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली, हे मी मनाचं बोलत नाही..'', फडणवीसांसमोर अजित पवारांचं विधान

Ajit Pawar News: अजित पवार म्हणाले की, महात्मा फुले यांनी पुणे ते रायगड पायी चालत जाऊन पाला-पाचोळ्यात असलेली शिवरायांची समाधी शोधून काढली, हे मी मनाचे सांगत नाही याचे कागदपत्रं आहेत. त्यांनी समाधीची साफसफाई करुन फुले वाहिली, हे सगळं कागदपत्रांमध्ये आहे. त्यावरुनच मी बोलतोय.
Mohan Bhagwat: ''महात्मा फुलेंनीच शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली, हे मी मनाचं बोलत नाही..'', फडणवीसांसमोर अजित पवारांचं विधान
Updated on

Nashik News: महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा नाशिकमध्ये संपन्न झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, छगन भुजबळ यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अजित पवारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीबद्दल स्पष्टपणे विधान केलं आहे. मागे पुण्यात मोहन भागवतांनी केलेल्या विधानानंतर वाद उभा राहिला होता.

काय म्हणाले होते मोहन भागवत?

मोहन भागवत यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला देताना म्हटलं होतं की, "इंग्रजांच्याविरुद्ध लढतानासुद्धा शिवाजी महाराज इथेच होऊन गेले. इथे सुद्धा त्यांचं स्मरण व्हावं म्हणून जागरण केलं. रायगडावर उत्सव सुरु केला. टिळकांनी ते सर्व शोधून काढलं वैगरे वैगरे.. ही इथली स्थिती असतानासुद्धा रविंद्रनाथ टागोरांनीही शिवाजी महाराजांवर कविता लिहिली."

नाशिकमध्ये अजित पवार काय म्हणाले?

अजित पवार म्हणाले की, महात्मा फुले यांनी पुणे ते रायगड पायी चालत जाऊन पाला-पाचोळ्यात असलेली शिवरायांची समाधी शोधून काढली, हे मी मनाचे सांगत नाही याचे कागदपत्रं आहेत. त्यांनी समाधीची साफसफाई करुन फुले वाहिली, हे सगळं कागदपत्रांमध्ये आहे. त्यावरुनच मी बोलतोय. पुढे महात्मा फुलेंनी पुण्यात शिवछत्रपतींचा सोहळा सुरु केला, असं अजित पवार म्हणाले.

लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपवर जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली होती. अजित पवारांना सोबत घेण्यावरुनही संघाने भाजपला खडेबोल सुनावले. लोकसभा निवडणुकीतील पराभवाला तेही एक कारण असल्याचं लेखामधून म्हटलं गेलं. त्यानंतर अजित पवार गटाकडून सातत्याने प्रतिक्रिया येत होत्या.

दरम्यान, शनिवारी नाशिकमध्ये पुतळा लोकार्पण सोहळ्यात बोलताना अजित पवार म्हणाले की, एवढा मोठा अर्धाकृती पुतळा मी महाराष्ट्रात पाहिला नाही. या स्मारकामुळे नाशिकच्या लौकिकात भर पडली आहे. शिवछत्रपती-फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारानं आपण राज्य चालवतो. महापुरुषांचा विचार घेऊनच राज्यात निर्णय घेतले जातात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.