Ajit Pawar Latest News: अजित पवारांनी वाढवलं भाजपच्या दिग्गज नेत्यांचे टेन्शन; नव्या समीकरणाने नेते चिंतेत

Maharashtra Politics Update : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र लढण्याची घोषणाही केली. त्यामुळे २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीतील उमेदवारी वाटप करण्याचे गणित कसे जुळवीणार, असे टेन्शन सध्या दोन्ही पक्षांच्या समर्थकांना लागले आहे.
Ajit Pawar Latest News: अजित पवारांनी वाढवलं भाजपच्या दिग्गज नेत्यांचे टेन्शन; नव्या समीकरणाने नेते चिंतेत
Updated on

Maharashtra Politics : राज्यात शिवसेना व भाजपचे सरकार संपूर्ण बहुमतात असतानाही राष्ट्रवादीचा मोठा गट सत्तेत समाविष्ट करून घेण्यात आला.

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र लढण्याची घोषणाही केली. त्यामुळे २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीतील उमेदवारी वाटप करण्याचे गणित कसे जुळवीणार, असे टेन्शन सध्या दोन्ही पक्षांच्या समर्थकांना लागले आहे.

जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप दोन्ही पक्ष राजकीय ताकद बाळगून असल्याने त्यांना सहा विधानसभा मतदार संघाच्या वाटण्या घालताना राज्यातील सत्तेतील मोठा भाऊ असलेल्या शिवसेनेला काय, असा प्रश्न आहे.

Ajit Pawar Latest News: अजित पवारांनी वाढवलं भाजपच्या दिग्गज नेत्यांचे टेन्शन; नव्या समीकरणाने नेते चिंतेत
Nagpur Crime: धक्कादायक! नागपूरात बसमध्ये प्रवासी महिलेवर चाकू हल्ला; आरोपी फरार

तर, परळीची विधानसभेची जागा कोण लढविणार हा सर्वात कळीचा मुद्दा असणार आहे. कारण, मंत्री धनंजय मुंडे परळीतून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना पराभूत करून विजयी झालेले आहेत. एकत्र निवडणुका लढवायच्या तर परळीतून लढणार कोण, हाच मोठा प्रश्न असणार आहे.

रविवारी राज्यात नव्याने एक राजकीय भूकंप झाला आणि राष्ट्रवादीतील एक सत्तेत सहभागी झाला. वास्तविक विधानसभेत भाजप व शिवसेनेचे संपूर्ण बहुमत असतानाही राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांना सत्तेत स्थान देण्यात आले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून मोदींच्या पंतप्रधानपदासाठी अधिकाधिक खासदार विजयी व्हावेत, या गणितामुळे हे नवे राजकीय समीकरण उदयास आले. परंतु, या समीकरणामुळे २०२४ च्या विधानसभेतील जिल्ह्याचे समीकरण चांगलेच बिघडण्याचा अंदाज आहे.

प्रथमत: जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप हे दोन्हीही मोठे पक्ष आहेत. आता दोघेही सत्तेत सोबत आणि आगामी निवडणुकीत तिघे (शिवसेनेसह) एकत्र लढणार म्हणल्यास या सहा जागांची वाटणी करायची कशी असा यक्षप्रश्न आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या वाटण्या झाल्या तर शिवसेनेच्या पदरात कोणती जागा टाकायची असाही प्रश्न आहे. अगोदर वाटपातील आकड्यांचे गणित सुटले तरी मतदार संघाचे गणित सुटणे फारच कठीण आहे.

कारण, अजित पवार यांच्या गटाकडून मंत्रिपद भेटलेले धनंजय मुंडे परळी मतदार संघातून विजयी झालेले आहेत. तर, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा देखील हाच मतदार संघ आहे. मग, आता नेमकी कोणत्या पक्षाला ही जागा सुटणार व कोण ही निवडणूक लढविणार हसा प्रश्न आहे.

दरम्यान, सध्या सत्तेत असलेले धनंजय मुंडे परळीतून प्रतिनिधित्व करतात, तर भाजपच्या नमिता मुंदडा केजमधून प्रतिनिधित्व करतात.

भाजपचे लक्ष्मण पवार गेवराईतून प्रतिनिधित्व करतात. तर, राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके माजलगावमधून प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे सद्यःस्थितीत तरी आमदारांची जागा आमदारांना या तत्त्वाने या मंडळींना प्रतिस्पर्धी नाही.

विधानसभेला बीडमधून असलेल्या संदीप क्षीरसागर यांनी शरद पवारांची साथ देण्याचा निर्णय जाहीर केल्याने त्यांचा या वाटपात प्रश्न नाही. आष्टीच्या बाळासाहेब आजबे यांनी अद्याप भूमिका जाहीर केलेली नाही.

Ajit Pawar Latest News: अजित पवारांनी वाढवलं भाजपच्या दिग्गज नेत्यांचे टेन्शन; नव्या समीकरणाने नेते चिंतेत
Teacher: शिक्षकांसाठी खुशखबर! राज्यातील खासगी अनुदानित शिक्षकांना मिळणार चार टक्‍के महागाई भत्ता वाढ

तीन मुंडे; दोन जागा

पूर्वीच्या आघाडीत (काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस) परळीची एकमेव जागा काँग्रेसकडे असायची. पण, मागच्या विधानसभा निवडणुकीवेळी तत्कालीन विरोधीपक्षनेते असलेल्या धनंजय मुंडे यांच्यासाठी राष्ट्रवादीने ही जागा काँग्रेसकडून आपल्या पदरात पाडून घेतली होती.

विशेष म्हणजे या बदल्यात काँग्रेसला जिल्ह्यात कुठलीही जागा दिली नव्हती. त्यामुळे गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा जिल्ह्यात उमेदवारच नव्हता. आता धनंजय मुंडे हे अजित पवार यांचे निकटवर्तीय तर आहेतच.

शिवाय देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे ऋणानुबंध देखील अगदी निकटचे आहेत. त्यामुळे ही जागा त्यांनाच मिळेल, असा दावा त्यांच्या समर्थकांचा आहे. मग, पंकजा मुंडे यांचे काय, असा प्रश्न आहे.

जर, परळीची जागा भाजपला सुटणार नसेल तर पंकजा मुंडे लोकसभेला लढतील का, असाही प्रश्न आहे. मात्र, या अदलाबदलीमुळे मग डॉ. प्रीतम मुंडे यांचे काय, असाही प्रश्न आहे. प्रीतम मुंडे सध्या लोकसभेत दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करत असून आगामी निवडणुकीसाठी त्यांनी तयारीही सुरु केली आहे.

आता परळी विधानसभा व बीड लोकसभा या दोन जागांत तीन मुंडे भावंडे कशा वाटण्या करतात? की, आता जिल्ह्यात आणखी नवे काही समीकरण उभारणार हेही पाहावे लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.