NCP Ajit Pawar left Pune visit halfway fueled political debate Maharashtra political news
NCP Ajit Pawar left Pune visit halfway fueled political debate Maharashtra political newsSakal

Maharashtra Politics : अजित पवार ३५-४० आमदारांसह भाजपासोबत सत्तास्थापनासाठी सज्ज; प्रफुल पटेल सूत्रधार?

राष्ट्रवादीच्या सावध आमदारांनी शरद पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी अजित यांच्यावर दबाव आणल्याच्याही चर्चा आहेत.
Published on

अजित पवार नाराज आहे, नॉटरिचेबल आहेत, अशा अनेक चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. आता याच चर्चांमध्ये भर म्हणून अजित पवार सत्तास्थापनेसाठी तयार असल्याचा दावा केला जात आहे. यासाठी अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे ३५-४० आमदारही असल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं सरकार आता पडताना दिसत आहे आणि भाजपसोबत युती करून राष्ट्रवादीचे अजित पवार हे सत्तास्थापनेच्या मार्गावर आहेत. शिंदे यांच्या डोक्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या पक्षांतराच्या निकालाची टांगती तलवार असल्याने आता सत्तापालटाची गरज आहे, असं मत ज्येष्ठ पत्रकार सुधीर सुर्यवंशी यांनी व्यक्त केलं आहे.

NCP Ajit Pawar left Pune visit halfway fueled political debate Maharashtra political news
Ajit Pawar: वज्रमुठ सभेत अजित पवार भाषण करणार नाहीत; स्वतःच केला खुलासा

न्यू इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार, अजित यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे. त्यांना राष्ट्रवादीच्या ३५-४० आमदारांचा पाठिंबा आहे, त्यामुळे पक्षांतर विरोधी कायदा लागू होणार नाही. मात्र, त्यांच्यासोबत गेलेल्या वरिष्ठ नेत्यांची इच्छा आहे की त्यांनी पक्षाचे संस्थापक शरद पवार यांची संमती मिळावी, जेणेकरून 2019 मध्ये भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा फसवणूक टाळता येईल. शरद पवार भाजपसोबत जाण्यास तयार नाहीत.

NCP Ajit Pawar left Pune visit halfway fueled political debate Maharashtra political news
Ajit Pawar : 'मविआ'च्या उद्याच्या सभेला अजित पवार जाणार नाहीत? काय म्हणतायत इतर पक्षांचे नेते?

त्यांनी अजित पवारांना स्वतःसांगितलं की ते भाजपाशी जुळवून घेऊन त्यांच्या राजकीय कारकिर्दीला कलंक लावायला तयार नाहीत. अजित यांच्या समर्थकांना याची जाणीव आहे की शरद पवारांच्या जनभावना बदलण्याच्या क्षमतेमुळे त्यांच्या विरोधात जाणे म्हणजे राजकीय आत्महत्या असू शकते,” असे राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सावध आमदारांनी शरद पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी अजित यांच्यावर दबाव आणला असल्याचं न्यू इंडियन एक्सप्रेसने म्हटलं आहे.

८ एप्रिल रोजी अजित पवार यांनी संपर्क साधला तेव्हा, ते अंतिम करार करण्यासाठी भाजप नेते अमित शहा यांना भेटण्यासाठी गेल्याचंही काही सूत्रांनी सांगितलं. “पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे खातेवाटपाचा निर्णय घेण्यासाठी त्यांच्यासोबत होते,” असं एका सूत्राने सांगितलं.

NCP Ajit Pawar left Pune visit halfway fueled political debate Maharashtra political news
Supriya Sule: "... ते तर कोणीच सांगू शकत नाही", सुप्रिया सुळेंची अजित पवार प्रकरणावर मिश्किल प्रतिक्रिया

'भाजपची स्थिती अत्यंत कठीण आहे. पक्षाचे नाव आणि चिन्ह गमावले असले तरी उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा आदित्य यांची लोकप्रियता वाढली आहे. भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार, राज्यातील लोकसभेच्या एकूण ४८ जागांपैकी महाविकास आघाडीला ३३ जागा मिळतील. भाजपला महाराष्ट्र गमावणे परवडणारे नाही. भाजपला मुख्यमंत्री म्हणून मराठा चेहरा हवा आहे कारण त्यांच्याकडे ३५% मतदार आहेत, त्यामुळे अजित पवार यांना खेचण्याचा प्रयत्न सुरू असल्याच्याही चर्चा आहेत.

प्रफुल पटेल सूत्रधार आहेत?

शरद पवार यांनी अलीकडेच नवी दिल्लीत काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली तेव्हा प्रफुल्ल पटेल अनुपस्थित होते. सुनील तटकरे यांच्यासमवेत अजित यांच्या भाजप युतीमध्ये जाण्याचे काम पटेल यांनी केलं आहे, असं वृत्त न्यू इंडियन एक्सप्रेसमध्ये दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.