Ajit Pawar: अजित पवारांचे मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांना पत्र, केली 'ही' मागणी

Ajit Pawar
Ajit Pawar
Updated on

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले आहे. गारपिटीने नुकसान झालेल्या शेती पीकासाठी हेक्टरी ५० हजार रुपये व फळबागांसाठी हेक्टरी एक लाख रुपयांची मदत तातडीने जाहीर करा, असे मागणी करणारे पत्र अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.

अजित पवार म्हणाले, मार्च व एप्रिल महिन्यात राज्यात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नुकसान झालेल्या शेती पीकासाठी हेक्टरी ५० हजार रुपये व फळबागांसाठी हेक्टरी एक लाख रुपयांची मदत तातडीने जाहीर करावी.

या पत्रात मार्च व एप्रिल महिन्यात अवकाळी व गारपिटीमुळे झालेल्या पशूधनाच्या व घरांच्या नुकसानीसाठी एनडीआरएफच्या निकषाच्या दुप्पट मदत जाहीर करावी. वीज पडून मृत्युमुखी पडलेल्यांच्या व पारस येथील दुर्दैवी घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना एनडीआरएफमधून ४ लाख व मुख्यमंत्री मदत निधीतून ६ लाख रुपयांची मदत करावी. निर्यातक्षम द्राक्ष बागायतदार तसेच बेदाणा प्रक्रिया उद्योगांना भरीव मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

मागील खरीपात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी एनडीआरएफ निकषाच्या दुप्पट मदत जाहीर करण्यात आली होती. २७ मार्च २०२३ च्या नवीन आदेशामुळे दुप्पट मदतीचा निर्णय बदलून एनडीआरएफच्या जुन्या निकषात मामुली वाढ केलेली आहे. या नवीन आदेशाचा फेरविचार करुन एनडीआरएफच्या निकषाच्या दुप्पट मदतीबाबतचा निर्णय सरकारने घ्यावा, असे देखील अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar
Sharad Pawar : पवारांनी उभा केलेला राष्ट्रवादीचा किल्ला ढासळतोय, २० वर्षात 'अशी' झाली घसरण

सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत आहे. तथापि यासाठी NDVI चा नवीन निकष निश्चित करण्यात आला आहे. या निकषामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार नाही. त्यामुळे या निकषाचा फेरविचार करावा, अशा विविध मागण्या अजित पवार यांनी पत्रात केल्या आहेत.

दरम्यान, हातातोंडाशी आलेला घास लागोपाठ आलेल्या अवकाळीने हिरावून घेतल्याने शेतकरी खचून गेला आहे. शेतीसाठी केलेला खर्चदेखील निघेल की नाही अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. त्यामुळे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

Ajit Pawar
Hasan Mushrif : हसन मुश्रीफांना कोर्टाचा मोठा झटका! अटकेची टांगती तलवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.