Ajit Pawar: जन सन्मान यात्रेदरम्यान अजित पवारांच्या जिवाला धोका? गुप्त वार्ता विभागाने केले सतर्क

Ajit Pawar life in danger: गुप्तवार्ता विभागाला वरील भागात दहशतवादी संघटनांकडून धोकादायक हालचाली होत असल्याचं दिसून आलंय. त्यामुळे विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्यात.
Ajit Pawar
Ajit Pawar
Updated on

Ajit Pawar: उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा धुळे,जळगाव जिल्ह्यासह मालेगावचा दौरा आहे. त्याआधी अजित पवार यांची विशेष काळजी घेण्याची सूचना गुप्त वार्ता विभागाने पोलीस प्रशासनाला दिली आहे. गुप्तवार्ता विभागाला वरील भागात दहशतवादी संघटनांकडून धोकादायक हालचाली होत असल्याचं दिसून आलंय. त्यामुळे विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्यात.

अजित पवार यांचा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जन सन्मान यात्रा सुरु आहे. अजित पवार हे शनिवारी सिन्नर मध्ये होते. त्यांची पुढील यात्रा ही खानदेशात जाणार आहे. यावेळी त्यांच्या यात्रेदरम्यान धोका निर्माण होण्याचा इशारा गुप्त वार्ता विभागाने दिला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.