आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी सध्या कंबर कसली आहे. राज्यात महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष यांच्यात विधानसभेच्या जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. महायुतीमधील प्रत्येक पक्ष आपल्या पदरात जास्तीत जास्त जागा पाडून घेण्यासाठी प्रयत्नशिल आहेत. यादरम्यान बुधवरी रात्री उशिरा उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीला गेल्याच्या माहिती समोर आली आहे. या बैठकीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाची चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.